इंडोनेशियातल्या सालूबिरो गावात एक भयंकर प्रकार घडला आहे. शेतावर काम करण्यासाठी गेलेला शेतकरी दिवस संपला तरी घरी परतला नव्हता त्यामुळे घरचे आणि गावकरी काळजीत पडले होते. त्यानंतर सगळ्या गावक-यांनी त्याला शोधण्याचे प्रयत्न केले पण दुसरा दिवस उलटूनही त्यांना काही यश आले नाही. शेतात फक्त त्याच्या चपला आणि शेतीची काही अवजारे तेवढी गावक-यांना सापडली. पण दुस-या दिवशी गावक-यांना जो प्रकार दिसला त्याने मात्र त्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला.

शेतात काम करत असताना २५ वर्षीय अकबर नावाच्या शेतक-याला अजगराने अख्खं गिळलं. हा अजगर झाडीत लपला होता. पोट फुगवून बसलेल्या अजगराला पाहून गावक-यांना शंका आली. त्याने अजगराचे पोट फाडून बघितले असता त्यात अकबरचे मृत शरीर त्यांना दिसलं. हे पाहून गावक-यांच्या अंगावरही काटा उभा राहिला. या प्रकरणानंतर गावात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. याआधी अजगरांनी पाळीव प्राण्यांना किंवा जनावरांना गिळल्याचे अनेकदा पाहिले आहे पण माणसाला गिळण्याचा पहिलाच प्रकार असल्याचे गावच्या सरपंचांनी सांगितले. २०१३ मध्ये इंडोनेशियातल्या बाली येथे असाच प्रकार घडला होता. समुद्रकिना-या लगत असलेल्या हॉटेलच्या एका सुरक्षारक्षकाला अजगराने गिळले होते.

Story img Loader