Viral video: असं म्हणतात की शेतकऱ्याचा नाद करायचा नसतो. शेतकरी कधी काय करेल हे सांगता येत नाही. मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि धाडस असतं. मात्र याच शेतकऱ्याला नेहमीच कमजोर समजलं जातं. शेतातील पिकांना जसं तो आपलं मानतो तसंच शेतातील, रानातील प्राण्यांनाही तो आपलीच लेकरं मानतो. एकीकडे जंगलातल्या हिंसक प्राण्यांना घाबरणारे आपण आणि दुसरीकडे हा शेतकरी. आता तुम्ही म्हणाल नेमकं झालं तरी काय.. तर झालं असं की वाघ, सिंह, बिबट्यासारख्यां प्राण्यांना पाहून लांबूनच धूम ठोकतो आपण. मात्र या शेतकऱ्यानं त्याच्या शेतता आलेल्या एका बिबट्याबरोबर चक्क सेल्फी घेतलाय. विश्वास बसत नाही ना मग हा व्हिडीओ पाहा. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून अवाक् व्हाल..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूण बिबट्यासमोर उभा आहे आणि तो त्या बिबट्यासबोत सेल्फी काढत आहे. अनेकांना तो तरूण प्राणीसंग्रहालय किंवा वन्यजीव उद्यानात उभा राहून फोटो काढत असल्यासारख वाटत असेल. मात्र, तो तरूण आणि बिबट्या चक्क एका शेतात आहेत. बिबट्याच्या एकंदरीत हलचालींवरून तो बिबट्या माणसाळलेला असल्याचं जाणवत आहे. कारण, तो तरूण एकटा असूनही बिबट्या त्याच्यावर हल्ला करत नाहीये. त्याउलट तो शांत बसलेला दिसत आहे. हा शेतकरी तरुणही घाबरलाय असं दिसत नाहीये. अगदी माकडासमोर उभं राहून सेल्फी घ्यावा तसं त्याने या बिबट्यासोबत सेल्फी घेतला. व्हिडीओ पाहून अंगावर काटच येईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: पॅरिसमध्ये अशाप्रकारे होते सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता; ‘हे’ खास तंत्रज्ञान आपल्याकडे कधी येणार?
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही अवाक् झाले असून यावर वेगवगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ पाहून या तरुणाच्या डेअरिंगला बहुतेकांनी दाद दिली आहे. कुणी त्याला शेरदिल म्हटलं तर कुणी जिगरबाज. सेल्फी असावा तर असा अशी प्रतिक्रियाही काही युझर्सनी दिली आहे. अशा प्राण्यांसोबत सेल्फी घेण्याची कुणी हिंमत करेल का? असं एकानं म्हंटलंय तर दुसऱ्या युजरने धाडस जिवावर बेतू शकतं. अशी प्रतिक्रिया दिली आहे.