सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आश्चर्याचा धक्का देणारे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हो कारण या व्हिडीओमध्ये एक शेतकरी गायीचा जीव वाचवण्यासाठी थेट एका सिंहीणीशी भिडल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. येथील एका शेतकऱ्याच्या धाडसाचं नेटकरी खूप कौतुक करत आहेत. कारण या शेतकऱ्याने गायीला सिंहाच्या तावडीतून वाचवलं असून या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका सिंहीणीने गायीवर हल्ला केल्याचं दिसत आहे. यावेळी सिंहीणीने गायीला आपल्या पंजात पकडल्याचंही पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढताना अचानक बंद झाला दरवाजा, रेल्वे अधिकारी खाली पडला अन्…, थरारक Video व्हायरल

गायीचा जीव धोक्यात असल्याचं पाहताच शेतकरी अस्वस्थ होतो आणि तो सिंहिणीला हाकलवण्यासाठी काही सापडतंय का पाहात असल्याचं दिसत आहे. यावेळी तो पुढं पुढं चालत जातो आणि एक विट हातात घेऊन न घाबरता सिहींणीच्या दिशेने मोठमोठ्याने ओरडत जातो. शेतकऱ्याचा आवाज ऐकूण सिहींण गायीला सोडून पळून गेल्याचं व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.

सिंहाच्या तावडीत गाय सापडली होती गाय –

व्हिडिओमध्ये गाय सिंहिणीच्या तावडीत सापडल्याचं दिसत आहे. गाय सिंहिणीच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते पण तिचे प्रयत्न अयशस्वी होतात. यावेळी दोन्ही प्राणी रस्त्याच्या कडेला जातात. गायीच्या हल्ल्यात सिहींणीचा प्राण जाणार असं वाटत असतानाच तिथे एक शेतकरी देवदूत बनून येतो आणि गायीचे प्राण वाचवतो. या घटनेचा थरारक व्हिडीओ तिथे एका गाडीत असणाऱ्या काही लोकांनी शूट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer clashed with lioness for cow people are saluting seeing bravery exciting video in gujarat goes viral jap
Show comments