Farmer Crying Viral Video : आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो. शेतकरी सुखी राहिला तर देश आणि जग सुखी राहील असं आपण मानतो. जय जवान जय किसान अशा ब्रीदवाक्याचा वारंवार नेतेमंडळींकडून उल्लेख केला जातो. पण या शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये येणारे अश्रू काळजाचा ठोका चुकवणारे आहेत. आधीच आर्थिक अडचणींचा डोंगर कमी होईना, त्यातल्या त्यात ही नैसर्गिक आपत्ती सुचू देईना असली गत शेतकऱ्यांची झाली आहे. अशाच एका शेतकऱ्याचं अवकाळी पावसामुळे अतोनात नुकासन झालंय. आपल्या पिकाचं झालेलं नुकसान पाहून हा शेतकरी अक्षरश: ओक्साबोक्शी रडला. त्याचं ते रडणं कॅमेऱ्यात कैद झालंय. त्या क्षणाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कुणाच्याही डोळे पाणावतील, इतकं भयानक हे वास्तव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जमिनीत घाम गाळून सोन्यासारखं अन्न पिकवणारा त्याच्या वाट्याला संकट फार आणि सुख कमीच. कधी अवकाळी संकट तर कधी कर्ज आणि इतर त्रास शेतकऱ्याची काही समस्यांमधून सुटका होत नाही. कितीही संकट आली तरी शेतकरी आपल्या जमिनीवरचं प्रेम कधीच कमी करत नाही. जमीन ही त्याचा श्वास आणि जीव असते. लेकरांप्रमाणे आपल्या जमिनीचा सांभाळ तो करतो. मात्र हाच शेतकरी आज कोणत्या संकटाला सामोरं जातोय, किती संघर्ष सोसतोय, याची कल्पना आपण किंचितही करु शकणार नाही. महाराष्ट्रात शेतीच्या बांधावर अवकाळी पावसामुळे हाहाकार उडालाय. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतकरी आपल्या शेतातील पिकांचं नुकसान पाहून हतबल झाला आहे. आपल्या सोन्यासारख्या पिकांचं अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान पाहून शेतकरी ओक्साबोक्शी रडत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “भाळणं संपलं की उरतं फक्त सांभाळणं” आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दिली साथ; आजी-आजोबांचा VIDEO पाहून पाणावतील डोळे

insta_king_mh42 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून “अवकाळी पावसामुळे होत्याचं नव्हत झालं” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नोटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.