शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात कारण दिवसरात्र कष्ट करून स्वत: पिकवलेले धान्य जगाला देतो. शेतकऱ्याने शेती करणे सोडले तर अन्न पिकणार नाही, अन्न पिकले नाही तर आपण खाणार काय? शेतकरी शेती करतोय म्हणून आपल्या ताटात रोज अन्न असते. शेतकरी होण्यासाठी मन खूप मोठ असावं लागतं. शहरातील लोक मॉलमध्ये जाऊन हजारोची खरेदी करतात, हजार रुपये एका कॉफीला घालवतात पण भाजी खरेदी करताना मात्र भाव कमी करू पाहतात. एवढंच काय फुकटमध्ये कोथिंबिरी किंवा कडीपत्ता देखील अनेकजण मागतात. एका शेतकऱ्याला त्याची भाजीची लागवड करताना किती कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळा ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो पण आपण मात्र जरा पाऊस कोसळला की लगेच चीड चीड सुर करतो. “कशाला आला पाऊस?”, “किती पाऊस पडतो?” असे म्हणत शेतकऱ्याच्या मदतीला धावून येणाऱ्या पावसावर विनाकारण राग काढतो. शहरात सिमेंटच्या घरात राहणाऱ्या लोकांना पाऊस नको वाटतो पण पावसाळ्यात शेतकऱ्याचं घरात दिवस रात्र पाणी टप-टप गळतं असूनही तरीही तो पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो कारण शेतात पेरणी केलेले पिक त्याच पावसावर अवलंबून असते. शेतकरी होणे एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने शेतकऱ्याची कष्टाची जाण ठेवली पाहिजे. हाच संदेश cocoa_bunny_1192a पेजवर शेअर केलेला शेतकऱ्याचा व्हिडीओ आपल्याला देत आहे. “वाट तुझी पाहता.. नभ आलय भरून..शेत पडलंय ओसाड.. आता बरस तू गर्जून!!” असे कॅप्शन शेअर करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या मनातील भावना व्यक्त केली आहे.

हेही वाचा – कडक्याच्या उन्हात शांतपणे पाणी पितोय तहानलेला बिबट्या, IAS अधिकाऱ्याने शेअर केला दुर्मिळ क्षण

व्हिडीओमध्ये शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची झलक दिसत आहे. व्हिडीओसह एक कविता देखील ऐकू येते.
“नको पांडुरंगा मला ते सोन्या-चांदीचे दान रे, फक्त भिजव देवा ते तहानलेलं रान रे
कंबरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू, ढगांना थोडं हलव, भिजवं माझं गाव तू,
मोह नको, अंहकार नको, नको नवीन कपडे यावर्षी पिकू दे माझ्या शेतकऱ्याचा रान रे”

हेही वाचा – “त्याला जे कळलं ते…!” रस्ता ओलांडताना कुत्र्याने पाळला वाहतुकीचा नियम, Viral Videoने जिंकले नेटकऱ्यांचे मन

एका तरुणाने शेतकऱ्यासाठी पाऊस पडू दे म्हणून पांडुरंगाला प्रार्थना करत आहे.

व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे, “मुंबई व इतर शहरात राहणारे लोकं पाऊस फक्त्त एन्जॉय म्हणून बघतात तर माझा शेतकरी राजा जीवनात एका नव्या उमेदीने बघतो… म्हणून चांगला पाऊस पडो आणि बळीराज फुलो”

दुसरा म्हणाला, “खरंच काळजाला, स्पर्श झाले शब्द.खूप छान.”

तिसरा म्हणाला, “निसर्गाने दिली साथ तर येईल पुन्हा माझ्या बळीराजाचे राज्य,तुमच्या माझ्या मनातील आपल हक्काचं अधिराज्य”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer praying for rain to lord vitthal beautiful poem must watch viral video snk
Show comments