पावसाळा सुरु झाला की अनेकदा साप मानवी वस्तीमध्ये आढळतात. पावासाळ्यामध्ये जमिनीतील बिळांमध्ये पाणी साचल्याने साप अन्नाच्या आणि निवाऱ्याच्या शोधात मानवीवस्तीमध्ये शिरतात. ज्यामुळे अनेकदा घरांमध्ये, बागांमध्ये आणि अगदी बाहेर सोडलेल्या शूजमध्ये साप लपून बसतात. एवढचं काय टुव्हिलच्या सीटमध्ये किंवा हँडलमध्ये साप आढल्याचे अनेक व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. दरम्यान आता शेतातील टॅक्टरमध्ये साप आढळ्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुरक्षित राहण्याचे आवहन केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतकरी होणं सोपी गोष्ट नाही. ऊन, पाऊस, वारा झेलत शेतकरी दिवस रात्र शेतामध्ये कष्ट करत राहातो. शेती करताना शेतकऱ्याला अनेक संकटाचा सामना करावा लागतो कधी पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करावे लागते तर कधी शेतात लपलेल्या सापापासून स्वत:चा जीव वाचवावा लागतो. पावसाळ्यात मानवी वस्तीमध्ये साप शिरतात त्यामुळे सावगिरी बाळगावी लागते. शेतकऱ्यांना देखील सर्पदंश होऊ नये साठी काळजी घेत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका शेतात उभ्या असलेल्या टॅक्टरच्या सीटमध्ये साप लपून बसल्याचे आढळून आले आहे. व्हिडीओमध्ये दिसते की एक सप्रमित्र सापाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हा सर्पमित्र टॅक्टरचे सीट उचून जमिनीवर ठेवतो, तेवढ्यात सीटमध्ये लपलेला साप सळसळत बाहेर पडतो. साप पुन्हा टॅक्टरच्या टाकामध्ये जाऊन लपतो. सर्पमित्र अत्यंत चतुराईने सापाला ओढून बाहेर काढतो. सापला पकडण्यासाठी त्यांने हातात एक काठी देखील पकडलेली दिसत आहे ज्याच्या मदतीने तो सापाला स्वत:पासून दूर ठेवतो. सापाला एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवण्याचा तो प्रयत्न करतो आहे.

हेही वाचा – खेळ जीवन-मृत्यूचा! जीव वाचवण्यासाठी माकडाने लढवली शक्कल, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहिला बिबट्या, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. दरम्यान शेतकरी बांधवाना पावसाळ्यात सापापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सावध राहण्याचे आवाहन केले जाते. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून शेतकरी बांधवाना साप आढळल्याचे आपले अनुभव शेअर केले आहेत. एकाने कमेंट करून सांगितले की, “असाच प्रकार ७ वर्षापूर्वीच माझ्याबरोबर झाला होता.”

हेही वाचा –PHOTO: “नमस्कार मी पुणेकर, कृपया जोडप्यांनी…” पुण्यातल्या रिक्षातली भन्नाट पाटी व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल

काहींनी गंमतीने म्हटले की, “फारचं टॅक्टर प्रेमी साप दिसतोय”

तर दुसऱ्याने म्हटले की, “भावा, साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, आम्हाला भिती वाटत नाही त्याची” त्यानंतर एकाने म्हटले की, भाऊ काम करताना स्वत:ची पण काळजी घ्या.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers be careful while driving tractors during rainy season a snake was hiding under the seat see the thrilling video snk