Viral video: शेतकरी होणं सोपी गोष्ट नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत शेतकरी दिवस-रात्र शेतामध्ये कष्ट करीत राहतो. शेती करताना शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करावं लागतं, तर कधी शेतात लपलेल्या सापापासून स्वत:चा जीव वाचवावा लागतो. त्यात पावसाळा सुरू झाला की, सापांचा वावर वाढतो. पावसाळ्यात मानवी वस्तीमध्ये साप शिरतात. त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागते. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे की, जो कधीही, कुठेही दडी मारून बसलेला असू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. दरम्यान, तुम्हीही शेतात विजेची मोटर बंद वा चालू करण्यासाठी जात असाल, तर हा व्हिडीओ पाहा. या शेतकऱ्याबरोबर काय झालं ते पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

पावसाळा सुरू झाला की, अनेकदा साप मानवी वस्तीमध्ये आढळतात. पावसाळ्यामध्ये जमिनीतील बिळांमध्ये पाणी साठल्याने साप अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये शिरतात. त्यामुळे अनेकदा घराच्या कोपऱ्यात, अडगळीच्या जागी, बाग आणि अगदी घराबाहेर काढून ठेवलेल्या शूजमध्ये साप लपून बसतात. एवढंच काय टू व्हीलरच्या सीटमध्ये किंवा हँडलमध्ये साप आढळल्याचे अनेक व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक साप चक्क विजेच्या मोटरच्या बॉक्समध्ये लपून बसला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

शेतकऱ्याबरोबर काय घडलं

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतात पाणी चालू करण्याची जी विजेची मोटर असते, ती बंद वा चालू करण्यासाठी एक विजेचा बॉक्स असतो. या बॉक्समध्ये मोटर सुरू वा बंद करण्यासाठी बटण असतं. हीच मोटर बंद करण्यासाठी एक शेतकरी गेला असता, त्या बॉक्समध्ये एक मोठा साप लपून बसल्याचं त्याला दिसलं. मात्र, हा साप असा लपून बसला आहे की, समोरच्याला तो सहज दिसत नाहीये. अशा वेळी शेतकऱ्यानं जर बॉक्समध्ये हात घातला असता, तर तो साप चावण्याची शक्यता होती. मात्र, शेतकऱ्याला साप दिसला आणि पुढचा अनर्थ टळला. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतात मोटर चालू-बंद करायला जाताना काळजी घ्या.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; अशी चोरी केली की VIDEO पाहून गोंधळून जाल

हा व्हिडीओ sarpmitra_nilesh_patil नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.