Farmers Jugadu Video: असं म्हणतात काम करायला फक्त पुस्तकी शिक्षणच नव्हे तर डोकं लावण्याचं कसब अंगी असावं लागतं. आणि भारतात अशी जुगाडू डोकी प्रत्येक गल्ली बोळात अगदी भरभरून भरलेली आहेत. आजवर समोर आलेल्या कित्येक व्हिडीओजमधून भारतीयांनी भल्याभल्यांची बत्ती गुल करतील असे जुगाड अवघ्या दहा वीस रुपयांमध्ये काहीवेळा तर फुकट करून दाखवले आहेत. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तुम्हाला एलन मस्कच्या टेस्ला कंपनीची गाडी माहित असेल ना, चालकाने स्टिअरिंगला हात न लावता धावणारी गाडी बनवण्यासाठी त्या कंपनीने कोट्यवधी रुपये आधी खर्च केले आणि वर लोकांनाही खरेदीसाठी लाखो- करोडो रुपये खर्च करावे लागले पण काहीश्या समान तंत्रज्ञानाची झलक सध्या सोशल मीडियावर फक्त डोक्याच्या जोरावर केल्याचे दिसून येतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्ही बघू शकता एक शेतकरी मुलगा या व्हिडिओमध्ये गवताचा हा भलामोठा भारा घेऊन सायकलवरून जाताना दिसत आहे. यावेळी त्याने दोन्ही हातांनी गवताचा भारा गच्च धरला आहे आणि पाय मात्र सायकलचे पेडल मारण्यात गुंतले आहेत. हातापायाचा एवढा अचूक ताळमेळ तुम्ही कदाचितच पाहिला असेल.
बरं रस्ता सुद्धा काही सरळ नाही अशातही प्रत्येक वळणावर भाऱ्याचा भार आणि सायकल दोन्ही सांभाळून हा कलाकार लीलया सायकल चालवत आहे.

Video: डोक्यावरचा गवताचा भारा सांभाळू की सायकल चालवू?

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच काहींनी यावर कमेंट करून गावाकडे आधी असे अनेक कलाकार होते पण आता ते मुंबईत किंवा वेगळ्या मोठ्या शहरात कामाच्या रगाड्यात रगडले जात आहेत अशी खंत बोलून दाखवली आहे. आधी तर रस्तेही एवढे चांगले नव्हते पण आम्हीही अशावेळी गवताचे भारे उचलून असाच प्रवास करायचो असं म्हणत नेटकऱ्यांनी सुद्धा या दादाचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा<< “चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा…” तुम्हीही Rapido बुक करत असाल तर आधी ‘हे’ ट्वीट वाचा

टीप: हा जुगाड कितीही कौतुकास्पद असला तरी आपण कोणीही असे प्रकार करू नये जेणेकरून आपल्या व रस्त्यावरून जाणाऱ्या इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.