Viral Video : सध्या हिवाळा सुरू झाला आहे आणि सगळीकडे थंडीची चाहूल लागली आहे. स्वेटर विक्रीचे जिकडे तिकडे स्टॉल लागले आहे. अशातच सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी या तरुणाने अनोखा जुगाड कसा करायचा, हे या व्हिडीओत सांगितले आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका शेतातील आहे. या शेतकरी तरुणाच्या हातात शाल दिसत आहे. शालचा वापर करुन या तरुणाने अनोखा जुगाड करुन दाखवला आहे. हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी हा जुगाड कामी पडू शकतो. या शालच्या मदतीने हा तरुण संपूर्ण शरीर कस झाकायचं, हे करुन दाखवत आहे.
सहसा शेतकरी मित्र भर थंडीत शेतात राबत असतात. त्यांना थंडी लागू नये, म्हणून तरुणाने हा व्हिडीओ बनवलाय आणि त्यांना ही अनोखी ट्रिक सांगितली आहे.
हेही वाचा : ‘गाडी वाला आया है घर से कचरा निकाल’ गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
shetkarii_brand या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय,”हिवाळ्यात हा जुगाड कामाचा आहे, शेतकरी मित्रांनो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने लिहिलेय, “भारी आयडीया भाऊ” तर एका युजरने लिहिलेय, “शेतकरी ब्रॅण्डच वेगळा असतो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “लय भारी”