भारतात पहिलीच ‘पाद स्पर्धा’ सुरतमध्ये पार पडली. ‘व्हॉट द फार्ट’ असं नाव असलेल्या स्पर्धेत सहभागी होण्यात स्पर्धकांना लाज आडवी आली. त्यामुळे केवळ तीनच स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सुरतमध्ये २२ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा झाली. कविता परमार, आरजे देवानंग रावल आणि डॉ. प्रणव पाचिगर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. तर मुंबई, जयपूर आणि दुबईसारख्या शहरांमधील २०० पुरुष आणि स्त्रियांनी या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त तीनच स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली होती. या स्पर्धकांपैकी एक स्पर्धक हे सुरतचेच रहिवासी होते.
दरम्यान, केवळ तीनच स्पर्धक सहभागी झाले. मात्र स्पर्धकांपैकी कुणालाही नंबर मिळवता आला नाही. त्यामुळे आयोजकांनी सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. २५०० रुपये रोख व एक गिफ्ट असं बक्षिसाच स्वरूप होत.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. मात्र लाजाळूपणामुळे त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला नाही. बर्याच महिलांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. मात्र नंतर त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतली.
ही स्पर्धा गायक व अभिनेता यतिन संगोई आणि त्यांचे सहकारी मुल संघवी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली होती. चीन, अमेरिका या देशांमध्ये पादण्याच्या स्पर्धा होत असल्यामुळे त्यांनी ही स्पर्धा भारतातही आयोजित करण्याचे ठरवले होते.
भारतातील पहिल्या पाद स्पर्धेत कुणी मारली बाजी…?
ही ‘पाद स्पर्धा’ सुरतमध्ये पार पडली.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
आणखी वाचा
First published on: 23-09-2019 at 15:17 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farting contest organized in surat gujarat fart in competition abn