आपण बऱ्याचदा पाहिलं असेल ग्राहक आणि दुकानदारांमध्ये अनेकवेळा भांडणं होत असतात. ग्राहकांना मनासारखी सेवा नाही मिळाली तर ते दुकानदारावर राग काढतात, यामुळे वाद होतो. अशी बरीच उदाहरण आपण पाहिली आहेत. मात्र, सध्या समोर आलेली घटना हादरावून टाकणारी आहे, अमेरिकेत एका हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज नीट तळले नाही अशी तक्रार केली म्हणून ग्राहकांवर गोळीबार करण्यात आला. अमेरिकेतील एका फास्ट फूड कर्मचाऱ्याने वादानंतर तीन जणांच्या कुटुंबावर गोळीबार केला. याचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना २०२१ मध्ये ‘जॅक इन द बॉक्स’ या फास्ट-फूड रेस्टॉरंट चेनच्या ह्यूस्टन आउटलेटमध्ये घडली. पण, या धक्कादायक घटनेचे फुटेज कुटुंबाच्या वकिलाने नुकतेच प्रसिद्ध केले. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पिडीताने सांगितले की, त्याच्या कुटुंबाने कॉम्बो जेवण ऑर्डर केले परंतु फ्राईज नीट तळले नव्हते, याबाबत जेव्हा त्याने तक्रार केली तेव्हा त्याच्यात आणि कर्मचार्यांपैकी एकामध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर इतक्या भीषण घटनेत होईल याची कुणालाही कल्पान नव्हती. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फास्ट फूड कर्मचाऱ्याने ग्राहकावर आणि त्याच्या गर्भवती पत्नी आणि त्यांची ६ वर्षांची मुलगी या तीन सदस्यांच्या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या कारवर गोळीबार केला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “आयुष्याचा उत्सव साजरा करता आला पाहिजे, रडणं तर रोजचंच आहे,” चिमुकल्यांचा भन्नाट VIDEO रातोरात झाला व्हायरल
दरम्यान, घटनास्थळी पोलीस आले आणि त्यांनी परिस्थिती हाताळली. इंडिया टुडेच्या अहवालानुसार,वफास्ट-फूड रेस्टॉरंट तसेच अॅलोनिया फोर्ड यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.