Little Girl Viral Video : मुली या’पापा की परी’ म्हणजेच ‘बाबांची राजकन्या’ असतात. मुली आणि वडिलांचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं. मुलांचा कायम मला एक मुलगी हवी असा सूर असतो. त्या चिमुकलीला हात घेतल्यापासून त्यांचा एक ऋणानुबंध निर्माण होतं. वडील सतत तिच्यावर प्रेमरुपी सावली घेऊन वावर असतो. मोठेपणे वडिलांसारखाच जोडीदार हवा अशी मुलींची इच्छा असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाप-लेकीचं नातं कसं असतं…

काळ बदला, नात्याचं स्वरुप बदलं पण बापलेकीचं नातं आजही तसंच आहे. बाप-लेकीचं नातं कसं असतं हे दाखविणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हृदयस्पर्शी व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या बाबांसोबत आहे. बाबांनी तिला कुशीत उचलून घेतलंय. तिचे बाबा कलिंगड खात आहेत. बाबांना कलिंगड खाताना पाहून चिमुकलीला देखील कलिंगड खावंस वाटतं. त्यामुळे ती थेट बाबांकडे झेप घेते. कलिंगड खाण्यासाठी चिमुकलीने केलेली धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुख म्हणजे काय असतं…बाप लेकीसाठी यापेक्षा मोठं स्वर्गसुख काहीच नसतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Photo: भूगोलाच्या परीक्षेत विद्यार्थी जोमात, उत्तर वाचून शिक्षक कोमात; पाचवीच्या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल

आईच्या तुलनेत मुली वडिलांच्या अधिक जवळ असतात हे आपल्याला प्रत्येकाला महिती आहे. अनेकदा वडील आणि मुलीच्या नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर येत असतात. असाच काहीसा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father and daughter viral video baby girl jumps for eat watermelon cute baby girl video viral on social media srk