Viral Video Father become a model to fulfils deceased sons wish : एखाद्या कुटुंबात वडीलांचे त्यांच्या मुलांबद्दलचे प्रेम नेहमी लपलेले असते. वडील आपल्या मुलांसाठी कायम एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात आणि क्वचितच शब्दांच्या माध्यमातून आपल्या मुलांबद्दल आपुलकी व्यक्त करतात. पण कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या पाठीशी ते नेहमी भक्कम उभे असतात. एका पित्यासाठी सर्वात दु:खद गोष्ट काय असेल तर ती आपल्या तरूण मुलाचा डोळ्यांसमोर मृत्यू पाहाणे. हे दु:ख पेलून एका वडिलांनी आपल्या दिवंगत मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. सोशल मिडियावर एक व्हिडीओ सध्या चर्चेत असून यामध्ये एक व्यक्ती कायमचे सोडून गेलेल्या आपल्या १८ वर्षीय मुलाची इच्छा पूर्ण करताना दिसत आहेत.

नवीन कंबोज यांनी गेल्या वर्षी होळी सणादरम्यान कार अपघातात आपला १८ वर्षांचा मुलगा गमावला होता. नवीन कंबोज यांच्या १८ वर्षीय मुलाला मॉडल बनायचं होतं. आपल्या मुलाचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन यांनी स्वत: मॉडल बनण्याचा निर्णय घेतला.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
a bride took an oath before marriage and said she will never say sorry to her husband
“लग्नानंतर कधी भांडण झालं तर मी कधीच नवऱ्याला सॉरी म्हणणार नाही” नवरीने लग्नाआधीच घेतली शपथ, पाहा मजेशीर Video

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नवीन हे काही काळासाठी नैराश्यात गेले, मात्र नंतर त्यांनी स्वत:ला सावरलं आणि आपल्या दिवंगत मुलाला श्रध्दांजली वाहण्याचा निश्चय केला. त्यांनी स्वत:चं वजन कमी केलं आणि ते एक मॉडेल बनले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका ब्रँडसाठी मॉडलिंग करताना रॅम्प वॉक देखील केला आणि याबरोबरच आपल्या मुलाला श्रध्दांजली वाहिली.

अभिनेता आणि मॉडल दिनेश मोहन यांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की,, “आपल्या दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ आपल्या रॅम्प शोमध्ये चालून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत… त्यांनी आपल्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःला नैराश्यातून बाहेर काढले आणि अनेक किलो वजन कमी केले.”

“तुमचे धाडसाबद्दल आणि दु:ख खोल असलं तरी प्रेम त्यापेक्षा जास्त गहिरं आहे हे उदाहरणातून दाखवून दिल्याबद्दल नवीन कंबोज तुम्हाला सलाम,” असेही अभिनेता आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे. अनेकांनी नवीन कंबोज यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. तसेच मोहन यांच्या पोस्ट खाली अनेकांनी भावनिक कमेंट देखील केल्या आहेत.

हेही वाचा>> Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत भाजपाचा ५ जागांवर ५० टक्क्यांहून अधिकच्या मताधिक्याने विजय; ‘येथे’ मिळाली ९१.३२ टक्के मते

नवीन कंबोज काय म्हणाले?

कंबोज यांनी देखील इंस्टाग्रामवर पोस्ट करत मुलाचा मृत्यू आणि आपल्या मॉजलिंग पर्यंतच्या प्रवासासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, जेव्हा करण आम्हाला सोडून गेला तेव्हा काहीही करणं अशक्य वाटत होतं. एक वर्ष खूप वेदनेत गेलं. मी नेमही त्याच्याबद्दल विचार करत असे आणि जीवनातील रिकामेपण भरून काढण्याचा प्रयत्न करत असे. मात्र त्याच्या पहिल्या पुण्यतिथीला मी स्वतःला वचन दिले की मी त्याचे स्वप्न पूर्ण करेल. कंबोज यांनी पुढे सांगितले की, माझे वजन १०० किलो होते, पण पत्नी आणि लहान मुलीच्या मदतीने त्यांनी आपल्या मुलाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात येणार्‍या सर्व अडचणींवर मात करण्यात यशस्वी झाले.

Story img Loader