Viral video: आपल्या चुकांवर पांघरूण घालणारे, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या वडिलांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज वडिल आणि मुलांच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. वडिल आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तेच जर मुलांच्या जीवावर उठले तर काय?पोटच्या मुलांसाठी आई-वडील वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी त्यांच्या डोळ्यांत टचकन पाणी येतं. बाप तर आपल्या मुलांच्या पाठीशी नेहमी उभा असतो. मात्र हाच बाप जर हैवान झाला तर..अशाच एका वडिलांनी आपल्या चिमुकल्या मुलांना अमानुष मारहाण केलीय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका वडिलांनी आपल्या लहान मुलाला आणि मुलीला अमानुषपणे मारहाण केलीय. यावेळी चिमुकलीच्या पाठीवर मारलेल्याचे व्रण, जखमा दिसत आहेत. एवढ्याशा जिवाला इतक्या कठोरपणे मारायला कसा त्या बापाचा जीव झाला असेल असाच प्रश्न सर्वांना पडत आहे. मुलीसोबतच मुलालाही अतिशय क्रूरपणे मारहाण केली आहे. यामध्ये त्यांच्या संपूर्ण शरीरावर जखमा दिसत आहे. हेच सगळं शेजाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या लहानग्यांना मेडीकलमध्ये घेऊन जाऊन त्यांच्यावर उपचार केले.

याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या सर्व प्रकारानंतर शेजारच्या तरुणांनी या हैवान बापाचा शोध घेतला आणि त्याला पकडलं. त्यानंतर त्याला रस्त्यावरच त्यांनी बेदम चोप दिला. यावेळी त्याची बायको अडवायला मध्ये येत होती मात्र तिचं काहीही न ऐकता तरुणांनी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. व्हिडीओचा शेवट पाहून नेटकरीही बरोबर केलं, आणखी कठोर शिक्षा द्यायला हवी अशा प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Ajit Lavate (@ajit.lavate97)

तुम्ही जर लहानपण आठवत असाल तर प्रत्येकाला आईपेक्षा वडिलांचाच धाक अधिक असल्याचं जाणवेल. सर्वात जास्त प्रेम हे आईचं जाणवतं असंच कोणाचंही उत्तर येईल. याचा अर्थ बाबांचं प्रेम नसतं असा होत नाही. आईपेक्षा मुलं वडिलांना अधिक घाबरतात. आपल्याकडे आजही मुलगा आणि मुलींचं पालनपोषण हे वेगवेगळ्या पद्धतीने होतं. मुलींशी हळूवारपणे वागलं जातं काही बाबतीत तर मुलांना कठोरपणे समजावलं जातं. मात्र वडिलांची वागणूक ही मुलांच्या विकासात महत्त्वाची असते.