Father daughter dance Video: मुलगी ही खूप नशिबान लोकांच्या घरात जन्माला येते. ज्यांनी आयुष्यात काही चांगली कामं केली आहेत त्यांना नशिबात मुलीचा बाप होण्याचं भाग्य मिळते. आजही काही घरात मुलगी जन्माला आली तर तो शाप मानला जातो. पण जगात असेही लोक आहेत जे एका मुलीचा बाप होणे म्हणजे स्वत:ला भाग्यवान समजतात. मुलगी आणि वडिलांचं नातं खूप खास असतं. लेक झाली की वडील आनंदाने जल्लोष करतात, मात्र हेच वडिल आपल्या काळजाचा तुकडाही हसत बसत परक्याच्या हातात देतात.

असं म्हणतात की मुलीचं तिच्या वडिलांशी असणारं नातं हे जरा जास्तच खास असतं. लहानपणापासूनच मुली मोठ्या होताना त्यांच्या पहिल्या मित्रापासून ते त्यांच्या पहिल्या सुपरहिरोपर्यंत हे वडीलच त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. बरं वडिलांच्या बाबतीतसुद्धा तेच. लेक म्हणजे जीव, असं म्हणणारे तुमचेही बाबा असतील. अशा या ला़डक्या बाबांसोबत तुम्ही कधी बेभान डान्स केलाय का? नसेल केला, तर हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही किमान एकदातरी वडिलांना तो दाखवाल आणि म्हणाल बघा किती छान नाचताहेत ते..

video of a young girl dance on 26 January
Video : “अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे” २६ जानेवारीला तरुणीने सादर केलेला डान्स पाहून नेटकरी संतापले
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Video of a little child presents amazing lavani dance in a school program
Video : काय भारी नाचतोय राव! जि.प. शाळेत चिमुकल्याने सादर केली अप्रतिम लावणी; नेटकरी म्हणाले, “याच्यासमोर सर्व लावणी सम्राज्ञी फिक्या..”
gilr dance
“ऐका दाजीबा….!”, मराठमोळ्या गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून तुम्हीही व्हाल तिचे चाहते
Mother daughter amazing duo did an amazing dance on the Koli song Video viral
“तो चक चक सोन्याचा…”; माय-लेकीची भन्नाट जोडी, कोळी गीतावर केले अफलातून नृत्य! Video पाहून सांगा, कोणी मारली बाजी?
madhuri dixit dances on dola re dole song at wrap up party
Video : २२ वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्यावर माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स! पार्टीचं कारण होतं खूपच खास…
Husband's Romantic Dance for Wife Wins Hearts
Video : भर रस्त्यावर तरुणाने बायकोसाठी केला जबरदस्त डान्स! हृतिक रोशनलाही टाकले मागे, व्हिडीओ एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका भव्य अशा स्टेजवर हे काका बिनधास्तपणे आपल्या मुलीसाठी डान्स करत आहेत. मेरी दुनिया, मेरी दुनिया, मेरी दुनिया तू ही रे
मेरी ख़ुशियाँ, मेरी ख़ुशियाँ, मेरी ख़ुशियाँ तू ही रे (तू ही रे)
मेरी दुनिया, मेरी दुनिया, मेरी दुनिया तू ही रे
मेरी ख़ुशियाँ, मेरी ख़ुशियाँ, मेरी ख़ुशियाँ तू ही रे
रात-दिन तेरे लिए सज्दे करूँ, दुआएँ माँगू रे
मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बलाएँ माँगू रे या गाण्यावर काकांनी डान्स करत सर्वांनाच अवाक् केले आहे. वडील मुलीच्या या जोडीला सध्या प्रचंड लोकप्रियता मिळाली असून, नाचण्यासाठी वयाचं भान नसतं हेच सिद्ध करणाऱ्या या काकांना अनेकजण सलाम ठोकत आहेत. बरं इतकंच नव्हे तर यावेळी आपल्या लाडक्या बाबाला पाहून मुलीचेही डोळे पाणावलेले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” नवरीच्या पाठवणीचा ‘हा’ VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @weddingz.in या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले असून बऱ्याचजणांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.

Story img Loader