बऱ्याचदा घरामध्ये आईसोबत आपण सगळे काही मोकळेपणाने बोलत असतो, वागत असतो. मात्र, वडिलांबद्दल आपल्या मनात एक आदरयुक्त भीती म्हणा किंवा त्यांचा घरात एकंदरीत दरारा असल्याने, लहान मुले त्यांच्याशी तितक्या प्रमाणात मजामस्ती करीत नाहीत. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून वडील आपल्या लहान मुलीसोबत स्टेजवर अतिशय मजेने नाचत असल्याचे दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये भलीमोठी दाढी, गळ्यात चंदेरी चेन, काळ्या रंगाचा टी-शर्ट व पॅन्ट घातलेल्या आणि आडदांड व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तीने, बॅले डान्स करणाऱ्यांप्रमाणे झिरझिरीत असा छोटा ‘टुटू’ स्कर्ट घातल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्याच्या मुलीने, लाल-पांढऱ्या रंगाचा चमकदार ड्रेस घातलेला दिसतो. अशी दोघांची अतिशय गोंडस दिसणारी जोडी स्टेजवर नाचत आहे. वडील आपल्या मुलीला नाचण्यामध्ये मदत करीत, तिला कधी वर उचलून घेतो, तर कधी आपल्याभोवती गोल फिरवतो.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Bobby Deol
‘जमाल कुडू’ची व्हायरल झालेल्या डान्स स्टेपमागची प्रेरणा काय? बॉबी देओल खुलासा करत म्हणाला, “मी लहान असताना…”

हेही वाचा : ऑफिसमधील सिक्रेट सांतामध्ये मिळालेली भेटवस्तू उघडून पहिले आणि…. ‘परत कधीच खेळणार नाही’, म्हणत शेअर केली पोस्ट…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @tiana_janine या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला असून, त्याला ‘तुम्ही सहा फूट पाच इंचांचे आणि ३५० एलबीएस [साधारण १५८ किलो] वजनाचे सामोअन [samoan] आहात; पण तुम्ही एका मुलीचे वडीलदेखील आहात, लॉल [LOL]’ [You’re a 6’5 350 lb samoan… but you’re also a girl dad lol] अशी कॅप्शन दिलेली आहे.

या गोड व्हिडीओने नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आणि पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरलदेखील झाला आहे. आतापर्यंत यास चार हजार ६२४ लाइक्स मिळाले असून, २०० हून अधिक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया पाहा

एकाने “त्या मुलीने वडिलांना आपल्यासोबत नाचायला सांगितले की, ते स्वतः तयार झाले? यामागे नेमका किस्सा काय आहे?” असे म्हणून पुढे डोळ्यांत बदाम असणारी इमोजी टाकली आहे. दुसऱ्याने “त्या मुलीला वर उचलल्यानांतर ती किती हसत आहे. बापरे खूप गोड,” असे लिहिले आहे. “टुटू स्कर्ट खूप मस्त!” असे तिसऱ्याने म्हटले. तर शेवटी चौथ्याने, “बापरे! किती गोड व्हिडीओ आहे हा. खूपच मस्त,” अशी प्रतिक्रिया दिलेली आपण पाहू शकतो.

@tiana_janine या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला आजवर ५७.८ K इतके व्ह्युज मिळाले आहेत.

Story img Loader