मुलं जेव्हा प्रेमाने एखादा हट्ट करतात तेव्हा आई-वडील मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कायम तयार असतात. मुलांच्या चेहऱ्यावर विखुरलेले हास्य पालकांचेही मन प्रसन्न करते. लहान मुलांना सारखं त्यांच्यासोबत कोणीतरी खेळावं असं त्यांना वाटत असत, मग फक्त त्यांच्याच वयाची मुलं हवी अस काही नसतं तर वेळेला घरी आई वडिलांनाही ही मुलं सळो की पळो करुन सोडतात. बरेचदा या मुलांसोबत खेळता खेळता पालकांना त्यांचा मारही खावा लागतो. एरवी मस्ती केल्यावर पालक मुलांना चोप देतात, मात्र कधी कधी पालकांनाही मुलांचा मार खावा लागतो, त्यात मुली म्हणजे बाबांच्या लाडक्या मग काय बाबांना मुलीचाही खोटा मार सहन कारावा लागतो, असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती घरात बेडवर झोपले आहेत. बाजूला एक चिमुकलीही दिसत आहे. तिच्या हातात एक ग्लास आहे. खेळता खेळता ही चिमुकली अचानक तिच्या झोपलेल्या वडिलांकडे जातो आणि हातातला ग्लास त्यांना मारते. वारंवार ती झोपलेल्या वडिलांच्या कधी डोक्यात ग्लास मारते तर कधी हातावर. तरीही वडिल चिमुकलीवर रागवत नाहीत. ती तिच्या बांबासोबत मस्ती करताना दिसत आहे. नेटकरीही या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – राजस्थानमध्ये फिल्मी स्टाईल अपहरण! मुलगी बेशुद्ध असताना घेतले सात फेरे, Video पाहून व्हाल थक्क
या व्हिडीओ @Deewani_1 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून यावर कॅप्शनमध्ये लिहले आहे की, एवढी सहनशक्ती फक्त एका वडिलांमध्येच याच जागी जर आई असती तर आतापर्यंत दोन धपाटे दिले असते.