Father daughter Viral video: लेक माहेराच सोनं, लेक सौख्याच औक्षण, लेक बासरीची धूण, लेक अंगणी पैंजण…मुलींना परकं धन समजलं जातं, कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण आईवडीलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आईवडीलांची सेवा करताना दिसतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होते, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते.ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचे अंतकरण जड होते. मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होतं..यानंतर ती कितीही वेळा माहेरी आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही. अशाच एका लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी आलेल्या शेतकरी बाप-लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा