Father daughter Viral video: लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होतं, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंत:करण जड होतं. मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होतं. त्यानंतर ती कितीही वेळा माहेरी आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही. अशाच एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो, “तोंड दुखत नाही का तुझं? किती बडबड, बडबड” आणि जेव्हा हीच लेक शांत असते तेव्हा आई म्हणते, “बरी आहेस ना तू?” वडील म्हणतात, “आज घरामध्ये एवढी शांतता का बरं?” भाऊ म्हणतो, “रागावलीस का?” आणि जेव्हा ती सासरी जाते, तेव्हा सगळे म्हणतात, “असं वाटतं घराची शोभाच गेली. शेवटी मुलगी दोन्ही ठिकाणी परकीच असते. ज्या घरात जन्म झाला, लहानाची मोठी झाली. स्वप्नं पाहिली, स्वप्नांचा पाठलाग केला आणि ती स्वप्न पूर्णही केली तरी तेच घर तिला सोडावं लागतं. यावेळी तिच्या मनाची काय घालमेल होत असेल हे कुणीच समजू शकत नाही. तर ज्या लेकीला लहानाची मोठी केली, तिला परक्याच्या घरी पाठविताना आई-वडिलांच्याही काळजाला काय वाटत असेल हे कुणीच नाही सांगू शकत.
बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं हे पाहायला मिळत आहे. लेकीच्या लग्नाच्या दिवशी काळजाच्या तुकड्याला वडील आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात शेवटचं कैद करताना दिसत आहेत. वडील त्यांच्या मोबाईलमध्ये मुलीचा फोटो काढताना दिसत आहे. यावेळी नकळत त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे. काहीच वेळात लेकीची पाठवणी होणार असल्याची त्यांना कदाचित जाणीव झाली असावी. वडील मुलीच्या डोक्यावर मायेनं हात फिरवतात, यावेळी त्यांना त्यांच्या डोळ्यांत आलेलं पाणी मात्र लपवता आलं नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पार्किंगमध्ये तरुणीवर माकडाचा जीवघेणा हल्ला; पायाचे लचके तोडले तरुणी खाली कोसळली अन्…VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावरील komal_kharade_beauty_care नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरनं यावर “कन्यादान” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरनं लेक प्रत्येकाच्या नशिबी नसते. लेक माहरेचं सोनं असते, अशी कमेंट केलीय.
© IE Online Media Services (P) Ltd