Father daughter Viral video: लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. घरात लक्ष्मी जन्माला आली की सर्वांनाच आनंद होतो पण सर्वात जास्त आनंद होतो तो वडिलांना असं नेहमीच म्हटलं जातं. मुलीच्या जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत तिला प्रत्येक घरात जपलं जातं. वडील मुलीचं नातंही खास असतं. मुलीचं लग्न करताना अनेक विधी केले जातात. पण त्यात वडील – मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा जर कोणता विधी असेल तर तो म्हणजे कन्यादान. पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाहसोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत प्रचंड भावनिक होतो. याच क्षणाचा बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो, “तोंड दुखत नाही का तुझं? किती बडबड, बडबड” आणि जेव्हा हीच लेक शांत असते तेव्हा आई म्हणते, “बरी आहेस ना तू?” वडील म्हणतात, “आज घरामध्ये एवढी शांतता का बरं?” भाऊ म्हणतो, “रागावलीस का?” आणि जेव्हा ती सासरी जाते, तेव्हा सगळे म्हणतात, “असं वाटतं घराची शोभाच गेली. शेवटी मुलगी दोन्ही ठिकाणी परकीच असते. ज्या घरात जन्म झाला, लहानाची मोठी झाली. स्वप्नं पाहिली, स्वप्नांचा पाठलाग केला आणि ती स्वप्न पूर्णही केली तरी तेच घर तिला सोडावं लागतं. यावेळी तिच्या मनाची काय घालमेल होत असेल हे कुणीच समजू शकत नाही. तर ज्या लेकीला लहानाची मोठी केली, तिला परक्याच्या घरी पाठविताना आई-वडिलांच्याही काळजाला काय वाटत असेल हे कुणीच नाही सांगू शकत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडिल आपल्या मुलीचं कन्यादान करत आहेत. यावेळी त्यांचा कंठ दाटून आला आहे मात्र म्हणतात ना डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जिरवण्याची ताकद ही फक्त एका बापामध्येच असते. मुलीला मात्र अश्रू अनावर झाले आहेत. आपल्या हक्काचं घर आता माहेर होणार आहे, आपण आता परक्याचं दन होणार आहे ही भावना जणू या मुलीच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं

h

h

हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आपल्या लेकीच्या पाठवणीचे क्षण आठवत आहेत. एकानं म्हंटलंय, “डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडेच असते” तर आणखी एका तरुणीने “हा क्षण शब्दात मांडण्यासारखा नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ makeup_artist_asmita_salvi या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video srk