Father daughter kanyadan Viral video: लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. घरात लक्ष्मी जन्माला आली की सर्वांनाच आनंद होतो पण सर्वात जास्त आनंद होतो तो वडिलांना असं नेहमीच म्हटलं जातं. मुलीच्या जन्मापासून तिचं लग्न होईपर्यंत तिला प्रत्येक घरात जपलं जातं. वडील मुलीचं नातंही खास असतं. मुलीचं लग्न करताना अनेक विधी केले जातात. पण त्यात वडील – मुलीचं नातं अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा जर कोणता विधी असेल तर तो म्हणजे कन्यादान. पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाहसोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत प्रचंड भावनिक होतो. याच क्षणाचा बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. बापाचं असणंच खूप काही असतं हेच या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लेकीचं लग्न आहे आणि वडिलांना अर्धांग वायूचा त्रास असल्यानं त्यांना उभं राहता येत नाहीये. अशावेळी ते व्हिलचेअरवर बसून लेकीचं कन्यादान करत आहे. यावेळी आता वडीलांपासून लांब जाण्याचं दुख: लेकीच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तर वडिलही आपले अश्रू लपवताना दिसत आहेत, त्यांचा कंठ दाटून आला आहे मात्र म्हणतात ना डोळ्यातलं पाणी डोळ्यातच जिरवण्याची ताकद ही फक्त एका बापामध्येच असते. मुलीला मात्र अश्रू अनावर झाले आहेत. आपल्या हक्काचं घर आता माहेर होणार आहे, आपण आता परक्याचं दन होणार आहे ही भावना जणू या मुलीच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तर लेक जाणार म्हणून आईलाही अश्रू अनावर झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ makeup_artist_asmita_salvi या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आपल्या लेकीच्या पाठवणीचे क्षण आठवत आहेत. एकानं म्हंटलंय, “डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडेच असते” तर आणखी एका तरुणीने “बापाचं असणंच सर्वकाही असतं” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader