Father daughter love: बाप-लेकीचं नातं काही स्पेशल असंत. कुठलीही मुलगी जर डोळे झाकून एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तिच्या वडिलांवर.बोट धरून चालायला शिकवणारा बाबा असतो, लेकीच्या हट्टासाठी घोडा होणाराही बाबा असतो. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणाराही बाबाच असतो. लेकीला नाजूक कळीसारखा सांभाळतो आणि प्रसंगी बाबाचा धाकही असतोच. म्हणूनच म्हणतात ना, बाप-लेकीच्या नात्याला कसलीच तोड नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचाच प्रत्यय देणाऱ्या एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय.सोशल मीडियावर बाप-लेकीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. वडिलांच्या राज्यात मुलगी राज्य करते, याचंच उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. पाहून तुमचं मन खूष होऊन जाईल

मुलगी ही खूप नशिबान लोकांच्या घरात जन्माला येते. लेक जर घराचे सौख्य असेल तर त्या सौख्याचे पावित्र्य तिचा बाबा असतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली तिच्या वडिलांच्या गाडीवर बिनधास्तपणे बसली आहे. एरवी गाडीवर एकटी बसायला घाबरणारी ती वडिलांच्या मागे बिनधास्त बसून प्रवासाचा आनंद घेत आहे. यावेळी ती गाडीवर उलटी बसली आहे आणि आजूबाजूचा परिसर, धावती झाडे, गाड्या यांचं निरिक्षण करत आपल्याच विश्वात रमली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना वडिलांची आणि त्यांच्या लहानपणीची आठवण येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका! चतुर मगरीनं कासवाची क्षणात केली शिकार; हल्ल्याचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ ankahe_al_fazz नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्या आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना एक सुंदर कॅप्शन देखील लिहिलीय. “हा आनंद महागड्या कारपेक्षा मोठा आहे” असं कॅप्शन देण्यात आलंय. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडू लागलाय. आत्तापर्यंत या व्हिडीओला ७१ हजार लाईक्स मिळाले आहेत. तसंच बाप-लेकीचे प्रेम पाहून यूजर्स भावूक झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father daughter love heartwarming viral video wins hearts srk