Father-daughter video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. आईबद्दल नेहमीच बोललं जातं मात्र पडद्यामागची भूमीका साकरणाऱ्या वडिलांकडे मात्र नेहमीच दुर्लक्ष होतं. अशाच एका वडिलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कधी कधी अशी परिस्थिती असते की तिला तोंड देण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वडील लेकीला पाठीवर बांधून रिक्षा चालवत आहेत. या बाळाची आईही कामाला गेल्यामुळे लेकीची जबाबदारी वडिलांवर आली आहे. आणि दुसरीकडे काम केलं नाहीतर खाणार काय हाही प्रश्न या वडिलांसमोर आहे. अशातच यातून मार्ग काढत वडिलांनी लेकिला पाठिवर बांधून काम सुरु केलं.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिमुकलीला खूप झोप आली असून ती बाबांच्या पाठीवरच पेंगत आहे, झोपत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. यादरम्यान रोडवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्या व्यक्तीने लहान मुलाला पाठीमागे बसवण्याचेही कारण तरुणाला विचारले. तेव्हा तरुणाईने बाळाची आई बाहेर गेली असल्याने बाळाला सोबत आणल्याचे सांगितले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “जान झोपलीस का?” जेव्हा आई बॉयफ्रेंडचा कॉल उचलते अन्…हायव्होल्टेज ड्रामा व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @help_by__god पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader