Viral Video : वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अन् आपुलकी दिसून येते. वडील त्यांच्या मुलीवर जीवापाड प्रेम करतात. मुलगी जेव्हा लहान असते तेव्हा तेव्हा तिला बाबांबरोबर सर्वात जास्त खेळायला आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या बाबाची नक्कल करताना दिसते. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वडील लेकीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे बालपण आठवेल. (father daughter love The little girl is copying her father exactly you would Never seen such a cute video before)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिमुकली करतेय वडिलांची हुबेहूब नक्कल!

हा व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कुटुंबातील लोक बसलेले आहेत. एक चिमुकली खाली चटईवर झोपलेली आहे आणि तिच्या शेजारी तिचे वडील झोपलेले आहे. वडील जसे झोपलेले आहेत तशीच चिमुकली झोपली आहे.ती वडिलांची नक्कल करताना दिसत आहे. बाबासारखं झोपण्याचा ती प्रयत्न करत आहे. हे पाहून तिथे बसलेल्या दोन तरुणी हसताना दिसतात. याशिवाय व्हिडीओमध्ये तुम्हाला एक छोटा कुत्रा दिसेल. त्याला दोरीने बांधून ठेवले आहे. तो सुद्धा व्हिडीओमध्ये उड्या मारताना दिसतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या घरातील चिमुकल्यांची आठवण येईल.

हेही वाचा : फाटलेली किंवा खराब झालेली नोट तुम्ही कधी जोडली आहे? २० रुपयांची खरी किंमत समजून घेणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C89jFEICFS5/?igsh=NHU3dHF2cmJ3azVo

nayakmanjunayak या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुली या फुलांसारख्या असतात. त्या आयुष्य सुंदरतेने भरून काढतात.”

हेही वाचा : आनंद महिंद्रांनी केलं मुंबई महापालिकेचं तोंडभरून कौतूक! विजयोत्सवानंतर अशी झाली होती मरिन ड्राईव्हची अवस्था, पाहा Video Viral

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यामुळेच पुरुषांची इच्छा असते की त्यांना गोड मुलगी व्हावी.” तर एका युजरने लिहिलेय, “मी खूप नशीबवान आहे की मला दोन मुली आहेत.” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती गोड! वडील मुलीचं नातं खूप गोड असते.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या छोट्या कुत्र्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father daughter love the little girl is copying her father exactly you would never seen such a cute video before video goes viral on social media ndj
Show comments