Father daughter Viral video: या जगात आल्यावर सर्वात आधी मुली कोणत्या पुरुषाला ओळखू लागतात, त्याच्यावर जीव ओवाळून टाकतात, ज्याच्या जीवावर जगणं, हसणं, बोलणं, चालणं सुरु करतात तो असतो त्यांचा लाडका बाबा! खरं तर असं म्हटलं जातं की मुलगी या जगात येण्याआधीपासून तिच्यावर कोणी जीव ओवाळून टाकत असेल तर ते वडिल असतात.कधीतरी आपली लेक मोठी होणार आणि उंबरठा ओलांडून सासरी जाणार हे माहित असूनही आपल्या श्वासापेक्षा जास्त जपतो आणि गरजेपेक्षा अधिक देण्यात कमी पडत नाही ते वडिल असतात.

जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होतं, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंत:करण जड होतं. मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होतं. त्यानंतर ती कितीही वेळा माहेरी आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही. अशाच एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न

लग्न आणि त्यानंतरचे सर्व विधी आटोपून येणारा निरोपाचा क्षण नववधूच्या मातापित्यासह सर्वांनाच जड जातो. महिने-दोन महिने लग्नाच्या गडबडीत सहज निघून जातात मात्र शेवटच्या क्षणी सगळ्यांचाच कंठ दाटून येतो. अशाच एका लेकिच्या पाठवणीला वडिलांचा कंठ दाटून आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडिल आपल्या लेकीला पाहून धायमोकलून रडताना दिसत आहेत. ज्या घरात जन्म झाला, लहानाची मोठी झाली. स्वप्नं पाहिली, स्वप्नांचा पाठलाग केला आणि ती स्वप्न पूर्णही केली तरी तेच घर तिला सोडावं लागतं. यावेळी तिच्या मनाची काय घालमेल होत असेल हे कुणीच समजू शकत नाही. तर ज्या लेकीला लहानाची मोठी केली, तिला परक्याच्या घरी पाठविताना आई-वडिलांच्याही काळजाला काय वाटत असेल हे कुणीच नाही सांगू शकत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गावच्या महिलेचा ‘आंखों में कजरा बालों में गजरा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप; VIDEO एकदा बघाच

“डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे”

हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आपल्या लेकीच्या पाठवणीचे क्षण आठवत आहेत. एकानं म्हंटलंय, “डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडेच असते” तर आणखी एका तरुणीने “हा क्षण शब्दात मांडण्यासारखा नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ marathi_weddingz या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Story img Loader