Viral video : वडील आणि मुलीचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात काळजी, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी असते. वडिल एखाद्या फुलाप्रमाणे मुली जपतात. वडिलांचा मुलीवर खूप जीव असतो आणि मुलींना सुद्धा वडिल खूप प्रिय असतात. बाप लेकीचे अनेक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वडिलांना पायऱ्या चढण्याचा त्रास होतोय, हे पाहून मुलीने असे काही केले की तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

वडील आपल्यासाठी लहानपणापासून अनेक गोष्टी करतात जे आपण मोजू शकत नाही. जेव्हा तो वृद्ध होतात तेव्हा त्यांची काळजी घेणे, ही मुलांची जबाबदारी असते. अशाच एका वृद्ध वडिल आणि मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मुलगी घरी लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात पाहते की तिचे वडील पायी येत आहे आणि त्यांना चालताना खूप त्रास होत आहे. त्यानंतर ही तरुणी धावत जाते आणि वडिलांना पायऱ्या चढण्यास मदत करते. पुढे तिला या गोष्टीविषयी वाईट वाटते तेव्हा ती एक युक्ती शोधते आणि असं काही करते की तुम्हीही पाहून अवाक् व्हाल.ती ऑनलाईन एक मशीन बघते आणि ती कामगाऱ्यांच्या हातून पायऱ्यांवर लावते. या मशीनच्या सीटवर बसून कोणीही पायऱ्या न चढता लिफ्टप्रमाणे वर चढू शकतो. ही मशीन बसवल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा वडील येतात तेव्हा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात पाहून त्यांना खाली घ्यायला जाते आणि वडिलांना ही मशीन दाखवते. पायऱ्या पायाने न चढता या मशीनवर बसून वडील थेट वर चढतात. मशीनवर बसल्यावर या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

हेही वाचा : VIDEO : भर पब्लिकसमोर महिलेनी तेजस्वी यादवांना मागितले किस अन् नंतर केली एक हजार रुपयांची…; व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : “हॅलो बाबा पीएसआय गोकुळ देशमुख बोलतोय” निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा वडिलांना केला फोन; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

sonia070286 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आईवडिलांना असा आधार द्या जसा त्यांनी लहानपणी तुम्हाला दिला होता.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई व्हिडीओ पाहून खूप छान वाटले” तर एका युजरने लिहिलेय, “फक्त मुलीच हे करू शकतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुली हा सर्वात मोठा आशीर्वाद असतात, हे तु सिद्ध केले.”