Father daughter Viral video: लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होतं, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते, त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंत:करण जड होतं. मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर होतं. त्यानंतर ती कितीही वेळा माहेरी आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही. अशाच एका बाप-लेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घरामध्ये जेव्हा मुलगी बोलते आणि बोलतच राहते तेव्हा घरातील प्रत्येक जण म्हणतो, “तोंड दुखत नाही का तुझं? किती बडबड, बडबड” आणि जेव्हा हीच लेक शांत असते तेव्हा आई म्हणते, “बरी आहेस ना तू?” वडील म्हणतात, “आज घरामध्ये एवढी शांतता का बरं?” भाऊ म्हणतो, “रागावलीस का?” आणि जेव्हा ती सासरी जाते, तेव्हा सगळे म्हणतात, “असं वाटतं घराची शोभाच गेली. शेवटी मुलगी दोन्ही ठिकाणी परकीच असते. ज्या घरात जन्म झाला, लहानाची मोठी झाली. स्वप्नं पाहिली, स्वप्नांचा पाठलाग केला आणि ती स्वप्न पूर्णही केली तरी तेच घर तिला सोडावं लागतं. यावेळी तिच्या मनाची काय घालमेल होत असेल हे कुणीच समजू शकत नाही. तर ज्या लेकीला लहानाची मोठी केली, तिला परक्याच्या घरी पाठविताना आई-वडिलांच्याही काळजाला काय वाटत असेल हे कुणीच नाही सांगू शकत.

kachya papayachi sukhi bhaji recipe in marathi bhaji recipe
कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
shani
Shani Margi 2024: शनीची प्रतिगामी चाल ‘या’ राशींच्या आयुष्यात घेऊन येईल आनंदाचे दिवस, मिळेल पैसाच पैसा
Heart touching Advertise banner against son from father life lessons for son photo viral on social media
Photo: “कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा
Loksatta chaturang bhay bhuti Fear of an event in life
‘भय’भूती: भय-भोवरा
A boy Rishab Dutta from Assam singing Lag Ja Gale song before death in hospitals bed
“..शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो” आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या तरुणानं गायलं गाणं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल
Heart warming video of father and son after passing exam emotional video
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
Kalyan, youth threatens mother, daughter marriage,
कल्याणमध्ये मुलीच्या लग्नाला विरोध केल्यास आईला ठार मारण्याची धमकी

लग्न आणि त्यानंतरचे सर्व विधी आटोपून येणारा निरोपाचा क्षण नववधूच्या मातापित्यासह सर्वांनाच जड जातो. महिने-दोन महिने लग्नाच्या गडबडीत सहज निघून जातात मात्र शेवटच्या क्षणी सगळ्यांचाच कंठ दाटून येतो. अशाच एका लेकिच्या पाठवणीला वडिलांचा कंठ दाटून आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडिल आपल्या लेकीला पाहून धायमोकलून रडताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “होणार सून मी या घरची” नवरीनं नवरदेवासाठी केला भन्नाट डान्स; सासरची मंडळीही पाहतच राहिली

हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करत आपल्या लेकीच्या पाठवणीचे क्षण आठवत आहेत. हा व्हिडीओ aagri_koli_makeup_bride या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.