Father daughter Viral video: लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. मात्र दुसरीकडे एक भयानक वास्तवही नाकारुन चालणार नाही ते म्हणजे क्षणिक प्रेमासाठी वडिलांचा विचार न करता अनेक मुली निघून जातात. अशावेळी काय होतं असेल त्या आई-वडिलांचं? सध्या सोशल मीडियावर लेकीच्या पाठवणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये लेक सासरी जातेय म्हणून बापाची होणारी घालमेल आणि त्याच्या मनला होणाऱ्या यातना पाहून तुमचेही डोळे पाणावतील. वयात आलेल्या प्रत्येक मुलीनं पाहावा असा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
आजकाल चुकीच्या व्यक्तीवर आंधळा विश्वास, प्रेमाची आणि एकत्र जीवन जगण्याची, लग्नाची, लिव्ह इन रिलेशनशिप बाबतीत स्वप्नाळू आणि भ्रामक कल्पना, त्यातून घेतलेले चुकीचे निर्णय, आई-वडिलांना न जुमानता स्वतःचं भविष्य पणाला लावून शेवटी अतिशय हृदयद्रावक रितीने संपलेल्या अनेक तरुण मुली हे चित्र वाढत चाललं आहे. हे थांबवण्यासाठी तरुण पिढीनं वेळीच सावध होणं गरजेचं आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न आणि त्यानंतरचे सर्व विधी आटोपून येणारा निरोपाचा क्षण नववधूच्या मातापित्यासह सर्वांनाच जड जातो. महिने-दोन महिने लग्नाच्या गडबडीत सहज निघून जातात मात्र शेवटच्या क्षणी सगळ्यांचाच कंठ दाटून येतो. अशाच एका लेकिच्या पाठवणीला वडिलांचा कंठ दाटून आलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडिल आपल्या लेकीला पाहून धायमोकलून रडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने, “मुलींनो पळून जाण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा असं आवाहन केलं आहे.
पाहा व्हिडीओ
स्वतःच्या आई-वडिलांचे हक्काचं घर सोडून, सर्व सुखसोयी, करिअर, चांगलं लग्नाचं स्थळ, चांगला मिळू शकणारा नवरा सोडून कोणत्याही मुलासोबत कुठेही मिळेल तिथे भाड्याने घरं घेऊन राहणं, पुढे दोघांनी मिळेल ती नोकरी-व्यवसाय करून पोट भरणे, जमलंच तर रजिस्टर लग्न करणं अथवा तसंच एकत्र राहणं या संघर्षांमध्ये आपलं खरं म्हणवणारं प्रेम टिकणार आहे का? सर्व तरुण मुलींनी स्वतःला हे सर्व प्रश्न विचारा आणि वेळेत स्वतःला सावरा. प्रेमाच्या नावाखाली स्वतःची इज्जत स्वतःचा जीव गमावून बसू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आई-वडिलांसारखे नि:स्वार्थ प्रेम दुसरी कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. तेव्हा विचार करा व आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांना मान खाली घालण्याची वेळ येऊ देऊ नका.