लेक ही वडिलांची लाडकी असते म्हणतात. कारण मुलींना जेवढी आपल्या वडिलांची काळजी असते तितकी कोणालाच नसते. नुकताच सोशल मीडियावर एक वडील आणि लेकीमधील प्रेम दर्शवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली उपाशी वडिलांच्या काळजीमुळे रडताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ खूप जुना आहे पण सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. या गोंडस व्हिडीओने नेटकऱ्याने मन जिंकले आहे. व्हिडीओ पाहून लोक भावूक होत आहे.

वडिलांच्या काळजीत ढसा ढसा रडली लेक
व्हिडीओमध्ये पाहू शकता की एक छोटी मुलगी एखाद्या खेळण्यासाठी नव्हे तर आपल्या वडिलांच्या आठवणी रडत आहे. मुलगी रडत रडत आपल्या आईला सांगते की, “आई मला वडिलांची खूप आठवण येते. ते दुकानावर जातात तेव्हा संध्याकाळपर्यंत जेवत नाही. उपाशीच राहून काम करतात. काहीच खात पित नाहीत. फक्त काम काम करत असतात.”

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

त्यावर मुलीची आई तिला समजावते की, “मी वडिलांची काळजी घेते. मी सकाळी त्यांना जेवायला देते. ते जेवण करून मग दुकानावर जातात.”

त्यावर मुलगी म्हणते, “पण ते सकाळी जेवतात का? संध्याकाळी जेवतात का? तूच सांग”

आई म्हणजे, “अगं बाळा ते रात्री घरी आल्यावर जेवतात ना.”

त्यावर चिमुकली म्हणते की, “रात्री जेवतात ना, संध्याकाळपर्यंत त्याचं पोट रिकामंच असते. मला त्यामुळे त्यांची काळजी वाटते. रात्रीसुद्धा ते काहीच न खाता-पिता गेले. त्यामुळे ते बारीक होत आहेत. मला त्यांची काळजी नाही वाटणार तर कोणाला वाटणार? जगातील प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांची काळजी असते.”

आई लेकीला समजावते की, “अगं ते आल्यावर जेवण करतील. त्यांचा ग्राहकाला सामान देणे जास्त गरजेचे होते.”

हेही वाचा – “…पसारा केला तर नवऱ्याने आवरायचा”; थेट बोलून गेली बायको, व्हायरल उखाणा व्हिडिओ एकदा पाहाच

त्यावर मुलगी म्हणते की, “उपाशी जायला पाहिजे होते का?”

आई म्हणते, “ते जेवण करत बसले आणि त्यांचा ग्राहक निघून गेला तर…”

मुलगी म्हणते, “कुठे जाईल ग्राहक?”
आई म्हणते. की, “अगं त्यांचा ग्राहक दुकानावर वाट पाहतो. त्यांच सामान त्यांना द्यावे लागेल ना.”

त्यावर मुलगी म्हणते, “आई, माणसाने जेवू पण शकत नाही का? ग्राहक जेवत नाही का? मग आपलेसुद्धा पापा जेवू शकतात ना. उपाशी का गेले?”

हेही वाचा – शिन-चॅनने गायले लोकप्रिय ‘खलासी’ गाणे; आंकाक्षा शर्माचा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, “हा तर गुजराती…”

रडवेल्या मुलीला आई समजावते की, “अगं बाळा पप्पा जेवण करतात, दुकानावर नाश्ता घेऊन जातात.”

तरीही चिमुकली म्हणते, “मला काळजी वाटते पप्पाची…मी काय करू…माझा स्वभावच इतका सौम्य आहे मी काय करू?” आई मुलीला समजावत असताना व्हिडीओ येथेच संपतो

व्हायरल व्हिडीओमधील या चिमुकलीला आपल्या उपाशी वडिलांची काळजी वाटत आहे. मुलीला आपल्या वडिलांची वाटत असलेली काळजी पाहून तुमचेही डोळे भरून येतील. व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की, लेक वडिलांच्या उगाच लाडक्या नसतात. इतक्या कमी वयात मुलगी वडिलांना समजून घेणे आणि वडिलांची चिंता करणे हे फक्त एक मुलगीच करू शकते. व्हिडीओ पाहून नक्कीच तुम्हीही भावूक व्हाल.

हेही वाचा – सायकल चोरी होऊ नये म्हणून वापरला ‘हटके जुगाड’; चोरी करणाऱ्यांना शिकवला धडा; Viral Video एकदा बघाच

सोशल मीडियावर एक्स(ट्विटर) वर व्हिडीओ @ChapraZila नावाच्या अकांउटवर शेअर केला आहे ज्याला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. व्हिडीओ २० ऑक्टोबर रोजी पोस्ट केला आहे जो आतापर्यंत ८७ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिगिले आहे. “या असतात मुली, किती प्रेमळ बाहुली आहे आणि किती सुंदर विचार आहेत.”

व्हिडीओवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. एक जण म्हणतो, मुलीचे माहित नाही पण हिच्या वडिलांइतका नशीबवान म्हणून या पूर्ण जगात कोणीही नाही.” दुसरा म्हणतो. “तिला तिट्या वडिलांची खूपच काळजी आहे”

तिसरा म्हणतो, “एक वडील म्हणून माझ्या डोळ्यातही पाणी आले”

चौथा म्हणतो, “मी खूप नशीबवान आहे आणि देवा तुझा आभारी आहे की तु मला एक मुलगी दिली. हा व्हिडीओ भावूक होता.”

Story img Loader