आपल्या मुलांचा आनंद प्रत्येक पालकासाठी सर्वोच्च असतो. मात्र जेव्हा त्यांची मुलं काहीतरी चांगलं काम करून समाजामध्ये त्यांची मान उंचवतात तेव्हा त्यांच्यासाठी आकाश ठेंगणे झालेले असते. अनेकदा तर अशा प्रसंगी आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रूही येतात. त्यातही मुलगी आणि वडील हे नाते वेगळेच असते. सध्या याच नात्याचे सौंदर्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा भावूक व्हिडीओ पाहताना तुमच्याही डोळ्यातून नक्कीच पाणी येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर पालक मुलांच्या नात्याशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतील. यातील अनेक व्हिडीओ हे मजेशीर असले तरी बरेच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही भावूक होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओही असाच आहे. यामध्ये एक पिता आपल्या लाडक्या मुलीला तिच्या कॉलेजमध्ये सोडायला जात आहे. या मुलीचा कॉलेजचा पहिलाच दिवस आहे. दरम्यान, मुलीचे बाबा यावेळी भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू येताना आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

Video : चालत्या बाइकवरून शेजारच्या दुचाकीस्वाराला मारत होती लाथ; पण दुसऱ्याच क्षणी असं काही घडलं की मिळालं ‘कर्माचं फळ’

प्रेक्षा नावाच्या मुलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून याला आतापर्यंत आठ मिलिअनहूनही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहलंय, “माझे वडील मला माझ्या स्वप्नातील ठिकाण, मिरांडा हाऊस कॉलेज, दिल्ली विद्यापीठात सोडायला आले होते. हा माझा कॉलेजचा पहिला दिवस होता. त्यामुळे आम्ही माझ्या कॉलेज कॅम्पसचा शोध घेत होतो. तेव्हा माझ्या वडिलांना अश्रू अनावर झाले होते.”

प्रेक्षा पुढे म्हणाली, “माझे स्वप्न पूर्ण होताना पाहून माझे बाबा इतके खुश होते की त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवणेही कठीण झाले. यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची लाडकी मुलगी आता त्यांच्यापासून खूप लांब राहायला जाणार आहे. पण त्यांच्या अश्रूंनी मला सांगितले की मी माझे स्वप्न पूर्ण करायला किती मेहनत आणि त्याग केला आहे. मी फक्त इतकंच म्हणू शकते की तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी मी काहीही करू शकते. धन्यवाद आई-बाबा. माझं तुमच्यावर प्रेम आहे.”

Photos : लग्नाच्या १२ वर्षांनंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक होणार वेगळे? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. इतकंच नाही तर अभिनेता आयुष मेहरा, रोहित शराफ आणि नेटफ्लिक्स इंडियानेही या व्हिडीओवर कमेंट केली आहे.