Viral Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो तर काही व्हिडीओ इतके हृदयस्पर्शी असतात की डोळ्यातून पाणी येतं. सध्या असाच एका वडिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई वडिल हे मुलांच्या आनंदासाठी वाट्टेल ते करतात पण अनेकदा आईविषयी लिहिले जाते पण बापाविषयी तितके लिहिले जात नाही तरीसुद्धा बाप जबाबदारी सांभाळून मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओतही एक बाप आपल्या मुलासाठी सायकल घेऊन जाताना दिसत आहे.

हेही वाचा : आजोबा-नातवाच्या प्रेमाला तोड नाही, चिमुकला प्रेमाने वाढतोय जेवण, VIDEO पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती एका हाताने सायकल चालवत आहे आणि दुसऱ्या हाताने मुलासाठी आणलेली नवी सायकल घेऊन जात आहे. सर्वसामान्य घरातील हा व्यक्ती आहे जो आपल्या मुलासाठी घरी सायकल घेऊन जाताना दिसत आहे. या बापमाणसाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

हा व्हिडीओ words_by_pd या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “बापमाणूस” तसेच व्हिडीओवर सुद्धा एक कॅप्शन लिहिले आहे, “मुलांची मनं जपण्यासाठी स्वत:च मन मारुन जगणारा माणूस”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “एक बापच असतो जो एवढ्या कष्टातून सुद्धा आपल्या मुला मुलीसाठी काहीही करू शकतो.” तर एका युजरने लिहिले, ” माझ्याकडे शब्द नाही, अप्रतिम व्हिडीओ”
आणखी एका युजरने लिहिले, “माझ्यापेक्षा माझ्या मुलांनी जास्त प्रगती करावी, असा विचार करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे बाबा” अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या वडिलांची आठवण आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father emotional video a father buy bicycle to complete childs wish video goes viral ndj