Father Emotional Video: आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी घराचा आधार बाप असतो. दिवस-रात्र खूप कष्ट करून मेहनत करून तो घरी येतो. कुटुंबाची भूक भागवण्यासाठी दोन वेळचं अन्न मिळण्यासाठी, तसंच मुलांच्या भविष्यासाठी तो राब राब राबत असतो. आपल्या लेकरांसाठी धडपडणारा बाप अनेकदा दु:ख मनात ठेवून, त्यांच्यासाठी झिजत असतो. त्यात गरिबी वाट्याला आली असेल, तर कष्ट करण्यावाचून काहीच पर्याय उरत नाही.
घरासाठी झिजणारा हा बाप बाहेर जाऊन किती कष्ट घेतो, हलाखीच्या दिवसांत पोटाची खळगी भरावी यासाठी किती मेहनत घेतो हे कधी कधी त्याच्या कुटुंबालाही माहीत नसतं. सध्या बापाचा हृदय पिळवटणारा एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक बाप अखंड मेहनत घेताना दिसतोय. तो पाठीवर मोटरसायकल उचलून त्याचा भार सोसताना दिसतोय.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणवले. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध माणूस ओझं उचलताना दिसतोय. आपल्या पाठीवर भलीमोठी बाईक घेऊन हा वृद्ध माणूस शिडीवर चढताना दिसतोय. गाडीच्या टपावर ठेवण्यासाठी तो माणूस ही बाईक आपल्या खांद्यावर घेऊन मेहनतीनं आपलं काम करताना दिसतोय.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/anurag_verma_1_4_3/reel/DCiiEo_v0Id/
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @anurag_verma_1_4_3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “और एक बेटा बोलता है की बापने मेरे लिए किया ही क्या है” (…आणि मुलगा म्हणतो बापाने माझ्यासाठी काय केलं?) अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. यादरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.
हेही वाचा… VIDEO: टायरवर बसून भरत होता हवा, पण पुढच्याच क्षणी ‘असं’ काही झालं की माणूस हवेत उडून जमिनीवर आदळला
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “सलाम आहे त्या वडिलांना” तर दुसऱ्याने “खूप हिंमतवाले आहेत काका” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “वडील हे जगातले खरे हिरो असतात.”
दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ याआधीही व्हायरल झाले आहेत. त्यात कुठे बापाची माया, तर कुठे त्याची मेहनत दिसली आहे. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.