सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. जगभरातील लाखो तरुण आपले भविष्य घडवण्यासाठी घर सोडून जातात. आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडून परक्या शहरात राहणाऱ्या तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक अशी उदाहरणं पाहायला मिळतात, जी येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असतात. मनात बाळगलेले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ही ‘पाखरं’ आपल्या घरी परतात. तेव्हा तो क्षण त्यांच्यासह त्यांच्या घरच्यांसाठी अविस्मरनीय असतो. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक आपणाला भावूक करणारा आणि आई-मुलाच्या नात्यातील निस्वार्थ प्रेम दाखवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही व्हिडीओतील आईसह मुलाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
मुलाला वर्दीत पाहण्यासारखं सुख नाही
या व्हिडीओमध्ये पाहू शकता, काहीतरी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून घराबाहेर पडलेला तरुण आज पहिल्यांदाच वर्दीमध्ये आई-वडिलांच्या समोर आला आहे. यावेळी तो येतो आणि आई-वडिलांना सलाम करतो, त्यानंतर तो त्याच्या डोक्यातली टोपी आपल्या वडिलांना घालतो. एवढा वेळ लेकाला कौतुकानं पाहणाऱ्या वडिलांना मात्र आता अश्रू अनावर होतात. त्यांना एवढा आनंद झाला की ते त्यांचे अश्रू लपवू शकले नाहीत.
आपल्या मुलाला पोलिसांच्या वर्दीत पाहायचं अनेक आई-वडिलांचं स्वप्न असतं. अशाच आई एका वडिलांच आपल्या लेकाला वर्दीत पाहायचं स्वप्न पूर्ण झालंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही व्हिडीओतील मुलाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा आई-वडिलांना पहिल्यांदा वर्दीमध्ये सल्युट करत आहे, यावेळी आईला अश्रू अनावर झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्या; लोक रुळावर उतरुन पळाले
हृदयाला भिडणारा आणि भावनिक असा एक बाप-लेकाचा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावूक करत आहे. या व्हिडीओनं नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणलं. हा व्हिडीओ police_bharti_and_mpsc या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.