सोशल मिडियावर अनेक अफलातून फोटो व्हायरल होत असतात जे लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका फोटोची चर्चा सुरू आहे. एका ८ वर्षाच्या मुलाने वडिलांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पत्र वाचून लोकांना धक्का बसला आहे कारण या पत्राद्वारे या चिमुकल्याने आपल्याच वडिलांना धमकी दिली आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमधील पत्र, एक प्रसिद्ध लेखक आणि बॅबिलोन बी म्हणून ओळखल्या जाणार्या व्यंगचित्राच्या वेबसाइटचे व्यवस्थापकीय संपादक, जोएल बेरी (Joel Berry) यांनी एक्सवर (ट्विटर) शेअर केले आहे. फोटोमध्ये हाताने लिहिलेले पत्र दिसत आहे जे त्यांना त्यांच्या मुलाने पाठवले आहे.
पत्रातील संदेश वाचून त्यातील बालिश लेखन आणि शुद्धलेखनाच्या चुका लगेच लक्षात येतात. जोएल बेरी यांना त्यांच्या आठ वर्षांच्या मुलांने हाताने लिहिलेले पत्र पाठवले आहे. त्यात लिहिले होते, “जोएल बेरी, महत्त्वाचा मेल त्वरित उघडा. आणि प्रिय जोएल बेरी, तुमच्या मुलांना आज रात्री आयर्न मॅन चित्रपट पाहू द्या नाहीतर तुम्हाला मारले जाईल. प्रति : सरकार”.
बेरीने ही खोटी धमकी त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली, विनोदीपणे लिहिले की, “माझ्या ८ वर्षांच्या मुलाशी विचित्र साम्य असलेल्या एका पोस्टमनने आज माझ्या मेलबॉक्समध्ये हे जमा केले” आता मी त्यांना हा चित्रपट पाहू पाहू दे्यावा आणि आम्ही या घरात बेकायदेशीर सरकारी आदेशांचे पालन कसे करत नाही याबद्दल त्यांना एक महत्त्वाचा धडा कसा शिकवावा याच्या पेचात अडकलो आहेत.
पत्राच्या या फोटोला 81.5k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. एकाने कमेंट केली की, “खूप गोंडस आणि आनंदी, अशा गोष्टींमुळे मला एक दिवस वडील व्हायचे आहे,”
बेरीने नंतर स्पष्च केले की, ”त्यांनी शेवटी आयर्न मॅन पाहिला.” त्यांनी त्यांच्या घरातील टेलिव्हिजनवर सुरु असलेल्या चित्रपटाचा स्नॅपशॉट पोस्ट केला आणि “सरकारने ही फेरी जिंकली” अशी खिल्ली उडवली.