Swiggy Viral Post : जर तुमचं घर अशा ठिकाणी असेल, जिथे जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर होत नाही. अशा परिस्थितीत ऑनलाईन अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून फूड ऑर्डर करणं खूप कठीण होतं. स्विगीवर फूड ऑर्डर करताना ठिकाणाची अचूक माहिती द्यावी लागते, ज्यामुळे फूड डिलिव्हरी करताना कर्मचाऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. परंतु, अशा गोष्टी काही माणसांना लागू होत नाहीत. एका ट्वीटर यूजरने स्विगीवर दिलेल्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ही फूड ऑर्डर देताना एका पठ्ठ्याने केलेला भन्नाट मेसेज पाहून कर्मचाऱ्यांनाही हसू आवरलं नाही.
स्विगीच्या फूड डिलिव्हरी ऑर्डरच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, संदीपला सांगा की बिट्टूची ऑर्डर आहे. लवकर करा. या मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, आम्ही या विकेंडला फूड ऑर्डर करण्याचा प्लॅन केला आणि वडीलांनी फूड ऑर्डर करण्यासाठी अजब निर्देश दिले. स्विगीच्या या पोस्टला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. लोक ही पोस्ट पाहून खूप खूश झाले. काही लोकांनी विनोदी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने म्हटलं, आयुष्यात एवढी ओळख असली पाहिजे. दुसऱ्या एका यूजरने म्हटलं, माझे वडीलही असेच आहेत.
स्विगीवर फूड ऑर्डर करताना अनेक लोक मजेशीर मेसेज करत असतात. तसंच यापूर्वी डिलिव्हरी बॉयचेही मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले आहेत. दिवसेंदिवस इंटरनेटवर अनेक मजेशीर गोष्टी व्हायरल होत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी काही लोक विचित्र गोष्टी करत असतात आणि लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा प्रकार या स्विगी फूड ऑर्डरच्या व्हायरल पोस्टच्या माध्यमातून समोर आला आहे.