Father holds child with one hand while driving: बाप आणि लेकाचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्यासारखा आपल्या लेकाला जपणारा हा बाप अनेक संकटांना सामोरा जात असतो. अगदी जन्म दिल्यापासून ते मोठं होईपर्यंत बाप आपल्या लेकाला सांभाळण्याची, त्याचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी कधीच विसरत नाही. लहान-मोठ्या सगळ्या संकटात तो आपल्या मुलांबरोबर खंबीरपणे उभा राहतो. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात बापाची ही कृती पाहून अनेक जण संतप्त झाले आहेत.

बाप आणि लेकराचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्काच बसेल. या व्हिडीओत एका बापावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे, कारण त्याची ही कृती अनेकांना विचार करायला लावणारी आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक माणूस हायवेवर बाईक चालवतोय. पण यात धोक्याची गोष्ट अशी की, या बाईकच्या मागे एक चिमुकलाही बसलेला दिसतोय. तो चिमुकला बाईकवर गाढ झोपलाय. रस्त्यावर बाईक चालवत असताना या माणसाने आपल्या मुलाला एका हाताने पकडलं असून दुसऱ्या हाताने तो बाईक चालवताना दिसत आहे. फक्त एका हाताचा वापर करून बाईक चालवणे किती धोकादायक आहे, हे या व्हिडीओमधून कळून येतंय. व्हिडीओची चर्चा सुरू असताना अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचं दिसतंय.

Viral Video of Father And Daughter
लाडूबाई…! चिखलातून जाताना बूट खराब होऊ नये म्हणून बाबांचा जुगाड; VIDEO पाहून कौतुक कराल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Shocking video Couple Caught On Camera Romancing While Sitting On Speeding Bike On Moradabad-Delhi Highway
VIDEO: “अरे जरा तरी लाज बाळगा” चालत्या बाईकवरच कपलचा रोमान्स; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रस्त्यावरच तरुणीचे अश्लील चाळे
Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
Accident video Auto rickshaw driver hit the bike caused accident dispute video viral on social media
तुम्हीच सांगा चूक कोणाची? भरवेगात रिक्षा आली अन् दुचाकीस्वाराला उडवलं, VIDEO मध्ये पाहा पुढे नेमकं काय घडलं…
Mother throw the child for reel woman Dance video viral on social media
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
Shocking video of a car hit the handcart crushed man emotional video viral on social media
“गरीब होणं सगळ्यात मोठा गुन्हा आहे”, हातगाडीचा जागीच झाला चुराडा अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पाहा VIDEO

बापाचा आणि चिमुकल्याचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @marathwada_marathi_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “एका हातात झोपलेलं लेकरू, दुसऱ्या हातात गाडी; बापाची मजबुरी म्हणायचं की मूर्खपणा” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच एक लाखापेक्षा जास्त व्हयुज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “असं करणं मूर्खपणा आहे. अचानक कोणती गाडी आडवी आली तर बाईक थांबवताना अपघात होऊ शकतो. आपल्या जीवाच्या पलीकडे आपण लेकराला जपतो, पण अशी जोखीम नाही घ्यायची. तर दुसऱ्याने “बापाचा मूर्खपणा आहे, मुलाला पुढे बसवायचं ना” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “भाऊ थोडावेळ थांबून घे, एवढं काय जातंय.” तर अनेकांनी वडिलांची बाजू घेत त्या बापाची काहीतरी मजबुरी असू शकते, अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

Story img Loader