प्रत्येक बाप आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. त्याची स्वप्ने साकार करण्यासाठी तो खूप मेहनत करतो. तो जगाशी भांडतो. मुलांना घडविण्यासाठी बाप मूकपणे कष्ट उपसत असतो. ते कष्ट उपसताना त्याला ना अहंकार असतो, ना दुःख, ना वेदना. बाप म्हणून काटेरी वाटेवरून चालत काम तो करीत असतो. कामात दिवसभर राबवून थकून घरी आल्यानंतर मात्र मुलांना पाहताच चेहऱ्यावर हास्य ज्याच्या फुलते तो बाप. बापाची घरात दहशत असली तर मुलांवर तो प्रेम करतच असतो. सध्या अशाच एका बापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही भावूक व्हाल, हे मात्र नक्की.
या व्हायरल व्हिडीओमधल्या बापाने आपल्या लेकाच्या आनंदासाठी चक्क लाकडी रणगाडा बनवला आहे. हा अनोखा रणगाडा पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये दोघे बाप लेक या लाकडी रणगाड्यावर बसलेले दिसून येत आहेत. दोघेही या लाकडी रणगाड्यावरच्या सवारीचा आनंद लुटताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणारा अनोखा लाकडी रणगाडा स्वतः या व्हिडीओमधल्या वडिलांनी तयार केलाय. हे ऐकून तुम्हाला सुरूवातीला आश्चर्य वाटेल. परंतू हे खरंय. आपल्या मुलाला आनंदी करण्यासाठी वडिलांनी ही कलाकारी केली आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरीबाई…नवऱ्यासमोर कुण्या दुसऱ्यासोबतच करू लागली डान्स
या व्हिडीओमध्ये दिसणारा लाकडी रणगाडा तयार करण्यासाठी वडिलांना एकूण १०० तासांचा अवधी लागला. तसंच हा अनोखा रणगाडा तयार करण्यासाठी त्यांना ११००० डॉलर इतका खर्च लागला. एका जुन्या गाडीवर ही कलाकारी करून नवा लूक देण्याचा प्रयत्न या वडिलांनी केलाय. वडिलांनी तयार केलेल्या या लाकडी रणगाड्यात बसल्यानंतर चिमुकल्या मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. अगदी आनंदाने हा चिमुकला लाकडी रणगाड्यावर बसण्याचा आनंद घेत आहे. एका जुन्या गाडीला नवा लूक देऊन लाकडी रणगाडा कसा काय बरं तयार केला असेल, असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तुमची ही उत्सुकता आणखी वाढवण्यापेक्षा तुम्हीच हा प्रत्यक्ष व्हिडीओ पाहा.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लज्जास्पद! भररस्त्यात एका दिव्यांगाला पती-पत्नीकडून काठीने मारहाण
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ट्रिपवरून परतलेल्या मालकाला पाहून कुत्र्याने मारली मिठी, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल
हा व्हिडीओ शंकर सिंह नावाच्या युजरने umashankarsingh नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधल्या चिमुकल्याचे गोड हावभाव आणि लाकडी रणगाडा लोकांना खूप आवडला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील शेअर करताना दिसून येत आहेत.