Father marries his daughter video: बाप आणि लेकीचं नातं अगदी पवित्र असतं. आपल्या अंगा खांद्यावर खेळवण्यापासून ते तिचं लग्न होईपर्यंत बाप आपल्या लेकीसाठी ज्या शक्य होतील त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. तिचे सगळे हट्ट, लाड पुरवतो. कारण बाप आणि लेकीचं नातं तितकंच खास असतं.

पण, सध्या बाप-लेकीच्या या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या एका घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे सध्या इंटरनेटवर विविध प्रकारची चर्चा सुरू आहे. व्हिडीओमध्ये बापाने स्वत:च्याच मुलीशी लग्न केल्याचा दावा केला जातोय. नेमका व्हिडीओ काय आहे, जाणून घेऊ या…

बाप-लेकीच्या नात्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Father Daughter Marriage)

सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक माणूस असा दावा करतोय की, त्याने त्याच्याच मुलीशी लग्न केलं आहे, पण घरातील लोक त्यांच्या नात्याला स्वीकारण्यास मंजुरी देत नाही आहेत.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, स्वत:ला वडील म्हणवणारा हा माणूस म्हणतोय की, “मला पण असं वाटतं की माझी मुलगी कुठे दुसरीकडे जाईल, आनंदात राहील की नाही माहीत नाही, म्हणून मी हिच्याशी लग्न केलं आणि आता ती दोन महिन्यांची गरोदर आहे. घरातले आणि बाहेरचे लोक आमचं हे लग्न मान्य करत नाही आहेत.”

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @niku.sad_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “मी काही बोललो तर वाद होईल,” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला २५ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

महिलेचा हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे तर कलियुगातील वडील आहेत”; तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुम्हाला लाज नाही वाटत, कमीत कमी बाप आणि मुलीच्या नात्याचा तरी आदर ठेवा”, तर तिसऱ्याने “दुनिया कधी सुधारणार समजत नाही” अशी कमेंट केली.