Viral Video: छोटंसं बाळ आईच्या लाडाने वाढते तर बाबांच्या धाकापुढे थोडं घाबरूनही राहते. मुलांच्या आवडीच्या वस्तू आणण्यापासून ते अगदी त्यांच्या समस्येवर उपाय शोधण्यापर्यंत बाबा नेहमीच ढाल म्हणून उभे असतात. तर आज सोशल मीडियावरही असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तीन चिमुकल्यांना मॉलमध्ये घेऊन जाण्यासाठी बाबा कसरत करताना दिसत आहेत. तसेच नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून ‘फादर ऑफ द इयर’ म्हणून वडिलांना संबोधलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. तीन जुळ्या चिमुकल्यांसह बाबा खरेदी करण्यासाठी निघाले आहेत. मॉलजवळ पोहचताच त्यांनी स्वतःच्या गाडीतून तिन्ही चिमुकल्यांना उतरवले. तीन वेगवेगळ्या बेबी स्ट्रॉलरमध्ये ( Baby Stroller) बाळांना ठेवण्यात आलेलं असते. तर त्यांना खरेदीसाठी मॉलमध्ये घेऊन जाण्यासाठी एका ट्रॉलीवर बाबा या तिघांच्या बेबी स्ट्रॉलरची रचना करून घेत असतात. पण, तिघांना एकाच ट्रॉलीवर ठेवण्यास जागा अपुरी पडत होती. तर बाबांनी या समस्येवर कसा तोडगा काढला ते पाहा.

हेही वाचा…चवताळलेल्या हत्तीचा पर्यटकांवर हल्ला; सफारी ट्रक उलटला अन्… VIDEO पाहून उडेल थरकाप

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मॉलमधील एक कमर्चाऱ्याकडून बाबा एक मोठी ट्रॉली मागवतात आणि त्यावर तिन्ही चिमुकल्यांच्या स्ट्रॉलरला ठेवून पाहतात. पण, तेव्हा सुद्धा एक स्ट्रॉलरला ठेवायला जागा कमी पडत असते. मग तेव्हा बाबा त्यांच्या गाडीमधून दोन हुक काढतात. एका स्ट्रॉलरला ट्रॉलीच्या हँडलवर लटकवून ठेवतात आणि मग तिन्ही स्ट्रॉलर एकाच ट्रॉलीवर व्यवस्थित राहतात. मग तिन्ही स्ट्रॉलर एकाच ट्रॉलीवर व्यवस्थित राहतात. हे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नकळत हसू येईल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ThebestFigen या एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मॉलच्या परिसरात उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे असे दिसून येत आहे. तसेच नेटकरी हा व्हिडीओ पाहून या वडिलांच्या कल्पनेचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father of the year viral video man seen shopping while pushing his babies strollers on trolley asp