‘बाप’ या एका शब्दातच किती वजन असत ना. जितकं वजन असत त्याहून कैकपटीने जास्त जबाबदारी बापाच्या खंद्यावरही असते. आयुष्यभर जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण करणारा बाप स्वतः साठी जगणं विसरूनच जातो. स्वतःच्या पायातली चप्पल तुटली तरी लेकरांच्या पायात मात्र भारी वाला बूट/सँडल असावा म्हणून पैसे साठवतो, स्वतःची कपडे कितीही जुने झाली, विरले-फाटले तरी पोरांना चांगली कपडे घेणारा पण मुलांच्या शिक्षणासाठी वाटले तितके काबाड कष्ट करणारा, मुलांना चांगलं वळण लावताना वेळ प्रसंगी कडक होणारा आणि लेकरांसहमज्जा मस्ती करताना स्वत: लेकरू होणारा, स्वतः आजारी पडल्यावर डॉक्टर जाणं टाळणारा पण लेकरू आजारी पडलं की धावत डॉक्टर कडे जाणारा, लेकरांना काय हवं काय नको बघता बघता स्वतःला विसरून जाणारा, मुलांना काहीही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र झटणारा बाप होणं खरंच खूप अवघड असतं. अनेकदा मुलांना माहित नसतं की आपलं वडील आपल्यावर किती प्रेम करतात. सध्या अशाच एका वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्या मुलाचा अभिनय पाहून वडीलांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. लेकाचे कौतूक करताना आनंदाने टाळ्या वाजवणाऱ्या वडीलांचा व्हिडीओने नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – जिंकलंस भावा! ‘आमी जे तोमार’ गाण्यावर तरुणाने सादर केलं अप्रतिम शास्त्रीय नृत्य, थेट कार्तिक आर्यनला दिली टक्कर

इंस्टागामवर lay_bhari_official नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा मंचावर अभिनय करत आहेत. प्रेक्षकांची गर्दी दिसत आहे. दरम्यान गर्दीच्या एका कोपऱ्यात उभे असलेले वडील लक्षपूर्वक आपल्या मुलांचा अभिनय पाहताना दिसत आहे. लेकांचा उत्तम अभिनय पाहून वडीलांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून या वडिलांना आपल्या मुलाचा खूप अभिनान वाटत आहे. आपल्या मुलाचे कौतूक होत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटीमुलाचे कौतूक करताना जोरजोरात टाळ्या वाजवत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भावूक झाले आहे. वडील -मुलाच्या नात्यावर प्रकाश टाकणारा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

हेही वाचा –धक्कादायक! भररस्त्यात विवस्त्र फिरत होती महिला, Video होतोय Viral

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की, “बाप बाप असतो त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे खरे…!” तसेच “बापच खरा पाठीराखा असतो” असा मजकूर व्हिडीओवर लिहलेला दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”ज्याने बाप जाणून घेतला त्याला कर्तव्याची जाण असते”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father overjoyed by sons performance tears of pride flow viral video snk