Viral Video : सध्या लग्नसराई सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नवरी नवरदेवाचे मजेशीर किस्से, डान्स गाण्याचे व्हिडीओ, उखाण्याचे व्हिडीओ इत्यादी सध्या चांगलेच चर्चेत आहे. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आई मुलीचे कन्यादान करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

वडिलाच्या निधनानंतर आईने केले मुलीचे कन्यादान

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरदेव नवरी लग्नाच्या मंडपात बसलेले दिसेल. कन्यादानाची विधी सुरू आहे आणि नवरीची आई कन्यादान करत आहे. सहसा कन्यादान हे वडील करतात पण नवरीच्या वडिलाचे निधन झाल्यामुळे तिची आई कन्यादान करताना दिसत आहे.
कन्यादान हा वडील आणि मुलीच्या नात्यातील एक सोहळा मानला जातो. कन्यादान ही एक परंपरा आहे. या परंपरेनुसार वडील मुलीला मुलाकडे सुपूर्द करतात आणि तिला सुखात ठेवण्याचे तसेच तिला सुरक्षित आणि आनंदी ठेवण्याचे वचन मागून घेतात. लग्नसोहळ्यातील कन्यादान हा एक भावुक क्षण असतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये वडिलांच निधन झाल्यामुळे तिची आई कन्यादानाची जबाबदारी पार पाडताना दिसते. या व्हिडीओवर लिहिलेय, “नवरीचे वडील वारले. आईने कन्यादान केले पण काहीअसो या क्षणी प्रत्येक मुलाला वडिलांची आठवण येतेच. तेच कॅमेऱ्यात कैद केले.”

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
mother emotional video sad stories of elderly mother
“माझं कोणी नाही रडायला….” वृद्ध आईचे ते शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी; काळजाला भिडणारा VIDEO तुम्हाला काय वाटत?

हेही वाचा : आतापर्यंतचा सर्वात भारी VIDEO, १९ लाखांची बाईक बघून ट्रॅफिक पोलिसानी तरुणांना थांबवलं अन् पुढे काय केलं पाहाच

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘नाद पाहिजे ओ…’ भरमंडपात हातात वीणा घेऊन त्याने ठेका धरला… छोट्या वारकऱ्याचा VIDEO पाहून म्हणाल “शेवटी संस्कार महत्त्वाचे”

dipaliadsul_kamble या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दादानी आता फक्त वडीलांसारखा जीव लावावा तिला” तर एका युजरने लिहिलेय, “कॅमेरामनने ही इमोशनल क्षण कैद केलंय म्हणजे नवरीने ज्यांच्या चेहऱ्यावर क्लिअर, दिसतंय ते दुःखी आहेत त्यांना कोणाची तरी आठवण येतेय किंवा कमी भासतेय, त्यांच्या बाबांना त्या आठवत आहेत हे ज्या व्यक्तीला कॅमेऱ्यात कैद करणे जमले ना तो खरा फोटोग्राफर. फोटो फक्त आठवणींसाठी नसतात तर तो क्षण जो ती व्यक्ती ने जगलेला असतो तो क्षण आठवण्यासाठी असतो. ते इमोशन आठवण्यासाठी असतात आणि ज्याला हे समजलं तोच खरा फोटोग्राफर” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader