एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगितलं की लहान मुलं ती करतातच. खरंतर हे लहान मुलंच नव्हे तर प्रौढांच्या बाबतीही सारखंच आहे. जिथं धोका आहे, असं सांगितलं जातं तिथंच काही लोक मुद्दामहून जातात आणि आपला वारंवार आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच धडकी भरेल.रेल्वे रूळ ओलांडू नये, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. पण तरी काही लोक जिने, ब्रीज चढण्याचा त्रास नको म्हणून हाच शॉर्टकट निवडतात. सध्या असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये काही लोक रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालताना दिसत आहेत, जशी वरदळ आपल्याकडे रेल्वे स्टेशवर असते तशीच गर्दी लोकांची वरदळ या स्टेशनवर दितस आहे. तुम्ही पाहू शकता रेल्वे स्टेशनवर एक व्यक्ती उभा आहे आणि त्याच्या हातात लहान बाळ आहे. दरम्यान बाजुच्या रेल्वे ट्रॅकवरुन एक ट्रेन येत आहे, मात्र याचा त्याला काहीही अंदाज नसतो. आणि याचवेळी तो व्यक्ती लहान मुलासोबत रेल्वे रुळ ओलांडायला जातो आणि नको ते धक्कादायक घडतं. याची जराही कल्पना नसताना मागून येणारी ट्रेन बाप-लेकाला धडक देते आणि ते दोघेही प्लॅटफॉर्मवर पडतात. या धडकेत तो व्यक्ती आणि चिमुकल्या दोघेही प्लॅटफॉर्मवर फेकले जातात.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Accident
Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू

त्यानंतर या दोघांचं काय झालं हे पुढे दाखविण्यात आलेलं नाही. मात्र, व्हिडीओवरुन तुम्ही अंदाज बांधू शकता की, दोघेही गंभीर जखमी झाले असणार.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: वाऱ्यासारखा सुसाट आला अन् बिबट्यावर हल्ला चढवला, गरुडाचा आकाशातील थरार एकदा पाहाच

आपण दररोज कुठे ना कुठे रेल्वे अपघात झाल्याच्या बातम्या ऐकतो. यापैकी बहुतांश अपघात हे रुळ ओलांडतानाच झालेले असतात. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती. अन् आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक भडकले आहेत. रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या अशा लोकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.

Story img Loader