शाळेत होणाऱ्या पालक आणि शिक्षकांच्या मिटींगचं नाव ऐकताच मुलांचा चेहरा फिका पडतो. लहान वयोगटातील सर्व मुलांमध्ये या मिटींगची चांगलीच भिती असते. पालक-शिक्षक मिटींगदरम्यान, शिक्षक मुलाने शाळेत केलेल्या सर्व कामांची तसेच त्याच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांना देतात. त्याच वेळी, पालकदेखील त्यांचा मुलगा घरात काय पराक्रम करतो याबाबतची माहिती शिक्षकांना देतात. त्यामुळे मुलांना आपला खरा चेहरा समोर येण्याची भिती सतावत असते.
परंतु आजच्या काळात पालक मुलांशी अतिशय मैत्रीपूर्ण वागतात. त्यामुळे मुलांना आता त्यांच्या पालकांची भिती वाटत नाही, मात्र, त्यांना त्यांच्या शिक्षकांची भिती वाटते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या वडिलांना पालक मिटींगला आल्यावर काय काय बोलायचं आणि काय नाही, हे शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर असून तो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणं कठीण होऊ शकतं.
हेही वाचा- २५ वर्षीय मुलाने लाकडापासून असा चमचा बनवला की…, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांना शाळेतील पालक मिटींगला जाण्यापूर्वी शिक्षकांसमोर काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे समजावून सांगत आहे. यावेळी मुलाचा व्हिडीओ बनवताना त्याचे वडील शाळेतील पालक-शिक्षक मिटींगदरम्यान शिक्षकांशी काय काय बोलू हे विचारताना दिसत आहेत.
यावेळी मुलगा सांगतो, “मी शाळेतून येतो, कुकीज खातो आणि झोपायला जातो हे शिक्षकांना सांगू नका, तर तुम्ही शिक्षकाला असं सांगा की, मी शाळेतून येतो आणि खिचडी खाऊन झोपतो.” यानंतर वडील म्हणतात, “मी खोटं का बोलायचं…? तू लापशी आणि खिचडी अजिबात खात नाहीस…” खूप स्नॅक्स खातोस. यावर मुलगा म्हणतो की, ही गोष्ट तुम्हाला शिक्षकांना सांगण्याची गरज नाही. हा मुलगा खूप अनोख्या अंदाजात आपल्या वडिलांशी बोलताना दिसत आहे. शिवाय ‘तुम्ही खोटं बोलणार नसाल तर मम्मी बोलेलं, तुम्ही काहीच बोलू नका’ असंही मुलगा वडिलांना सांगतो.
नेटकऱ्यांना आवडला व्हिडिओ –
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने, कोणाचा हुशार मुलगा आहे, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “खूप क्यूट” असं लिहिलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा मुलगा आयुष्यात खूप पुढे जाणार असंही लिहिलं आहे.