सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलाच्या प्रसंगावधानामुळे वडिलांचा जीव वाचला आहे. एका कुटुंबातील लोक सुट्टीनिमित्त आग्रा येथे फिरायला आले होते. यावेळी ते ताजमहाल पाहत असताना अचानक एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्या व्यक्तीच्या मुलाने सीपीआर (CPR) अर्थात कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन देऊन वडिलांचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण या मुलाचे कौतुक करत आहेत. तर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी सीपीआरबद्दलची माहिती प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं का आहे, हेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समजत असल्याचं म्हणत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे रहिवासी असलेले ७० वर्षीय रामराज उर्फ ​​राजू यांचा मुलगा भारतीय नौदलात तैनात आहे. रामराज यांचे कुटुंब आग्रा येथे फिरायला आले होते. हे सर्वजण ताजमहाल पाहत असताना दुपारच्या सुमारास रामराज यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर बेशुद्ध पडले. वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचं पाहताच मुलाने तत्काळ तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय मदत मागितली. वैद्यकीय मदत येईपर्यंत त्याने वडिलांच्या तोंड तोंडाला लावून श्वास द्यायला सुरुवात केली.

व्हिडीओत दिसत आहे की, रामराज यांना त्यांचा मुलगा तोंडाला तोंड लावून सीपीआर देत आहे. यावेळी कुटुंबातील इतर सदस्य वडिलांचे पाय चोळून मदत करत आहेत. सीपाआर वेळेत दिल्यामुळे वडीव शुद्धीवर येतात. मुलगा वडिलांना सीपीआर देत असल्याची घटना उपस्थित पर्यटकांनी मोबाईलमध्ये शूट केली होती, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तर या मुलाने सीपीआरद्वारे वडिलांचे प्राण वाचवल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर केवळ डॉक्टरच नव्हे, तर हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक सोशल मीडिया युजर त्या मुलाचे तोंडभरुन कौतुक करत आहे. दरम्यान, रामराज शुद्धीवर आल्यानंतर, ताजमहालच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना रुग्णवाहिकेतून लष्करी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर पुढील उपचार सुरू केले. शिवाय त्यांना वेळेवर सीपीआर मिळाला नसता तर त्यांना जीव गमवावा लागला असता, असं डॉक्टर म्हणत आहेत. त्यामुळे मुलाच्या प्रसंगावधानामुळेच वडिलांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सीपीआरसारख्या अन्य वैद्यकीय गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father suffers heart attack in taj mahal son saves his life giving cpr heart touching video viral jap