माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते. त्याचीच परतफेड म्हणून हे प्राणीही आपल्यावर तेवढंच प्रेम करतात. आपल्या मालकाची प्रत्येक गोष्ट ऐकतात. अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. चीनमध्ये राहणारा एक कुत्रा आपल्या मालकाची मुलगी नीट अभ्यास करते की नाही याकडे लक्ष ठेवत असतो. सध्या या कुत्र्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपली मुलगी शाळेचा गृहपाठ नीट करते की नाही हे पाहण्यासाठी तिच्या पित्याने आपल्या पाळीव कुत्र्याला तिच्यावर लक्ष ठेवण्याचं काम दिलं आहे. विशेष म्हणजे हा कुत्रादेखील आपलं कर्तव्य नीट बजावताना दिसतो. इतकंच नाही तर या मुलीने अभ्यासाच्यावेळी हातात फोन जरी घेतला तरी हा कुत्रा लगेच तिच्या हातातील फोन खालती पाडतो.

चीनमध्ये राहणारे ज्यू लियांग असं या कुत्र्याच्या मालकाचं नाव असून या कुत्र्याचं नाव फंटुअन असं आहे. घरामध्ये मांजर येऊ नये, त्यांना हुसकावून लावण्यासाठी ज्यू लियांग यांनी फंटुअनला घरी आणलं होतं. फंटुअन त्याचं काम चोखपणे करत होता. त्यामुळे आपल्या मस्तीखोर मुलीच्या शिन्याच्या अभ्यासावरदेखील तो नीट लक्ष ठेऊ शकतो, असा विचार ज्यू लियांग यांनी केला. त्यानुसार, त्यांनी फंटुअनला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. परिणामी, आता शिन्या अभ्यास करत असताना फंटुअन सतत तिच्या बाजूला बसलेला असतो. विशेष म्हणजे तिचा गृहपाठ होईपर्यंत फंटुअन तिथेच बसून राहतो.

फंटुअनमुळे आता माझी मुलगी तिच्या शाळेचा गृहपाठ नीट करते,अभ्यासाव्यतरिक्त तो तिच्यासोबत मस्तीही करतो. त्यामुळे फंटुअन आमच्या घरातल्या सदस्याप्रमाणेच वावरत असतो, असं ज्यू लियांग यांनी सांगितलं. तर मी अभ्यास करत असताना फंटुअन माझ्या बाजुला बसलेला असतो. त्यामुळे तो माझ्या वर्गमित्र असल्यासारखंच वाटत, असं शिन्याने सांगितलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father trained pet dog for supervision to make her daughter homework in china