‘Happy Father’s Day 2019 असं म्हणतात की जसजसं वय वाढतं तसतसं वडिलांबरोबरच्या नात्याचं मैत्रीत रुपांतर होत, मग ती मुलगी असो अथवा मुलगा. आपलं आपल्या वडिलांवर खूप प्रेम असल्याच आपण सर्वच जाणतो. यावेळी ते भेटवस्तू रुपाने व्यक्त करण्यात काय हरकत आहे? जून महिन्यातील तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. कुटुंबाच्या सुखासाठी रात्रं-दिवस काबाडकष्ट करणाऱ्या कणखर बाबांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी पर्यटनासाठी नेऊन अथवा त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थाचा बेत आखून या फादर्स-डेला बाबांप्रती प्रेम भावना व्यक्त करायला काहीच हरकत नाही. त्यांच्या आवडीचे एखादे पुस्तकं, वस्तू अथवा छानसे ग्रीटिंग कार्डदेखील भेट म्हणून तुम्ही देऊ शकता. तुमचं काम सोप करण्यासाठी आम्ही सुचवत आहोत काही अनोख्या कल्पना आणि गिफ्ट. वडिलांना सरप्राईज करण्यासाठी तुम्हाला नक्कीच कामाला येतील…
फिटनेस बँड –
वडिलांचे आरोग्य निरोगी आणि चांगले राहण्यासाठी त्यांना फिटनेस बँड गिफ्ट करू शकता. या फादर्स डेच्या दिवशी वडिलांना चांगले फिटनेस बँड गिफ्ट करून तुमच्यासाठी ते खास असल्याचा संदेश द्या.
स्ट्रेस फ्री स्पा ट्रिटमेंट
वडिलांकडे कार्यालयासबोत घरांतीलही जबाबदारी असते. त्यामुळे ते अनेकदा तणावात असतात. या फादर्स डेला त्यांना स्ट्रेस फ्री स्पा ट्रिटमेंटचा पास देऊन थोडासा तणाव दूर करू शकता.
म्यूजिक सिस्टम –
वडिलांना गाणी ऐकण्याचा छंद असेल तर त्यांना या फादर्स डे ला म्यूजिक सिस्टम भेट द्या. रिकाम्यावेळी गाण्याचा अस्वाद घेऊन त्यांचा तणाव दूर होण्यास मदत होईल. भेट देणाऱ्या म्यूजिक सिस्टममध्ये तुम्ही त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा खजाना भरा.
फूट मसाजर
दिवसभर राबून वडिल घरी आल्यानंतर त्यांची तणाव दूर करण्यासाठी फूट मसाजर कामाला येईल. या फादर्स डे ला त्यांना याशिवाय चांगले गिफ्ट असूच शकत नाही. फूट मसाजरमुळे फक्त तणावच नव्हे तर रक्ताभिसरणही जलद होईल.
सॉलिड डफल बॅग
तुमचे बाबा दररोज जिममध्ये जात असतील तर तुम्ही डफल बॅगही भेट देऊ शकता. ज्यामध्ये जिमचे उपयोगी सर्व साहित्य ते ठेवू शकतील. या बॅगचा साइड बॅग म्हणूनही वापर केला जाऊ शकतो.
- तुमचे बाबा उच्चपदस्थ अधिकारी असल्यास आणि त्यांना सतत कंपनीच्या कामानिमित्त मिटिंग, पार्टी अथवा सेमिनारला जावे लागत असल्यास एखादे उंची घड्याळ, शर्ट, पॅन्ट, पर्फ्युम किंवा गॉगलसारखी गिफ्ट देऊ शकता.
- बाबांना संगीत, नाटक अथवा चित्रपटाची आवड असल्यास एखाद्या चांगल्या संगीत कार्यक्रमाची, नाटकाची अथवा चित्रपटाची तिकिटं त्यांना भेट करू शकता.
- तुमच्या बाबांना बॅडमिंटन, टेबलटेनिस, कॅरम, क्रिकेट अथवा अन्य कुठल्या खेळाची आवड असल्यास त्यांना तशा स्वरुपाची भेटवस्तू देऊ शकता.
- बाबांना फोटोग्राफीची आवड असल्यास घरातल्यांबरोबरचे सहलीचे, सण-समारंभाचे आणि अन्य महत्वाचे फोटो-व्हिडिओ जमवून त्याचा छानसा व्हिडिओ तयार करून बाबांबरोबर तो पाहाण्याचा आनंद लुटा. व्हिडिओ संपायला येताच बाबांच्या हातात त्यांच्यासाठी घेतलेला कॅमेरा ठेवा. नक्कीच तो एक भावनात्मक क्षण असेल.
- तुमच्या बाबांना जर का वस्तू जमविण्याचा छंद असेल, तर तुम्हीदेखील एखादी वस्तू बाबांना भेट करून त्यांच्या संग्रहात भर घालू शकता. ही अविस्मरणिय आठवण कायम त्यांच्या जवळ एक ठेवा म्हणून राहील.
- तुमच्या बाबांना ट्रेकिंग, सायकलिंग, बाईकिंग अथवा साहसी खेळात भाग घेण्याची आवड असेल, तर तशाप्रकारची वस्तू त्यांना भेट म्हणून देऊ शकता.
- बाबांसाठी एखाद्या सरप्राईज पार्टीचे आयोजन करून त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवू शकता अथवा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी त्यांना जेवायला घेऊन जाऊ शकता.