Happy Father’s Day 2019: जून महिना आला की ‘फादर्स डे’च्या चर्चांना उधाण येते. जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी फादर्स डे असतो. हा फादर्स डे कधीपासून कोणत्या देशात साजरा केला जातो याबाबत फार कमी जणांना माहिती असते. म्हणूनच हा फादर्स डे नेमका कधी सुरु करण्यात आला. कोणकोणत्या देशांमध्ये तो साजरा केला जातो याविषयी जाणून घेऊया….
१६ जून रोजी असणारा फादर्स डे हे अमेरिकेचे इनव्हेन्शन आहे. अमेरिकन सरकारतर्फे १९१३ मध्ये मदर्स डे अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. मात्र त्यानंतर जवळपास ६० वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये फादर्स डे जाहीर करण्यात आला. तरीही अमेरिका आणि इंग्लंडमध्ये फादर्स आणि मदर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात साजरा केला जातो.
पोर्तुगाल, इटली आणि स्पेनमध्ये १९ मार्च रोजी सेंट जोसेफच्या वाढदिवसाच्या दिवशी फादर्स डे साजरा केला जातो. जिजसला माता मनणाऱ्या तिच्या नवऱ्याचा जन्मदिवस म्हणून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करतात. इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर जगातील जवळपास ७० देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला.
अमेरिकेत वडिलांना डिनर किंवा ब्रंच, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कार तसेच खेळाशी निगडीत वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. तर इंग्लंडमध्ये चॉकलेट, अल्कोहोल, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू या गिफ्ट म्हणून दिल्या जातात. काय मग तुम्ही केला का तुमचा फादर्स डे सेलिब्रेट? नसेल केला तरी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या वडिलांसाठी नक्की काही ना काही प्लॅन करा आणि त्यांना खूश करा.