जून महिन्यातील तिसरा रविवार फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आज जगभरात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येत असून, गुगलनंही डुडलच्या माध्यमातून हा खास दिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. या वर्षी १६ जूनला फादर्स डे साजरा करण्यात येत आहे.

डुडलमध्ये गुगलनं वडील आणि मुलांच्या नात्यांची परिभाषा दाखवली आहे. यामध्ये तीन अॅनिमेटेड रंगीबेरंगी व्हिडीओ केले आहेत. त्यामध्ये वडिलांसोबत मुलांची उपस्थिती, वडिलांसोबत मस्ती आणि वडिलांचा मुलांसाठी असणारा पाठिंबा दाखवला आहे.

या आधी ‘मदर्स डे’निमित्त गुगलनं याच थीमवर आधारित डुडल तयार केलं होतं. गेल्या वर्षी १८ जूनला हा दिवस साजरा करण्यात आला होता. हा दिवस गेल्या १०९ वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे.

‘फादर्स डे’ कधी-कुठे सुरू झाला?

१६ जून रोजी असणारा फादर्स डे हे अमेरिकेचे इनव्हेन्शन आहे. अमेरिकन सरकारतर्फे १९१३ मध्ये मदर्स डे अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. मात्र त्यानंतर जवळपास ६० वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये फादर्स डे जाहीर करण्यात आला. पोर्तुगाल, इटली आणि स्पेनमध्ये १९ मार्च रोजी सेंट जोसेफच्या वाढदिवसाच्या दिवशी फादर्स डे साजरा केला जातो. जिजसला माता मनणाऱ्या तिच्या नवऱ्याचा जन्मदिवस म्हणून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करतात. इंग्लंडमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर जगातील जवळपास ७० देशांमध्ये जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जाऊ लागला.

अमेरिकेत वडिलांना डिनर किंवा ब्रंच, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कार तसेच खेळाशी निगडीत वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. तर इंग्लंडमध्ये चॉकलेट, अल्कोहोल, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू या गिफ्ट म्हणून दिल्या जातात. काय मग तुम्ही केला का तुमचा फादर्स डे सेलिब्रेट? नसेल केला तरी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या वडिलांसाठी नक्की काही ना काही प्लॅन करा आणि त्यांना खूश करा.

Story img Loader