सर्व लाड पुरविणारा आणि जगातील सर्व सुख आणून देणारा एकमेव माणूस म्हणजे बाबा. मुलीच्या आयुष्यात वडिलांइतकं खास कोणीच नसतं. प्रत्येक मुलीसाठी वडील म्हणजे सर्वस्व आणि बाबांचं स्थान कधीच त्यांच्या आयुष्यात कोणी घेऊ शकत नाही.आई घराच मांगल्य असते तर बाबा घराच अस्तित्व. दोघेही घराचा भक्कम कणा. पालक म्हणून ते मुलांसाठी कुठेच कमी पडत नाही. मुलींचे सगळ्यात लाडके कोणी असेल तर ते बाबा. फादर्स डे च्या निमित्ताने बाप-लेकिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाप-लेकिचं प्रेम पाहायला मिळतंय. चिमुकली आपल्या बाबांना गालाव पपा देत आहे तर वडिलही मुलीचे लाड करत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये असं लिंहलं आहे की, खूप नशिबवान बाप असतो ज्याला मुलगी असते. हे अगदी खरंच आहे. कारण, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात वडिल असतात मात्र प्रत्येक वडिलांच्या आयुष्यात मुलगी असतेच असं नाही. वडिल आणि मुलीचं एकमेकांवरचं प्रेम कधीही न संपणारं आणि अतूट असतं हे पुन्हा एकदा पहायला मिळालं आहे. कशीही परिस्थिती असो गरिब किंवा श्रीमंत मुलीसाठी बाप हे नेहमीच एक हिरो राहिला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावुक झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
आयुष्यात जेव्हा मुलगा बघायचा असतो तेव्हाही मुलींना तो आपल्या बाबांसारखाच प्रेमळ आणि काळजी घेणारा हवा असतो आणि वडिलांनाही आपल्याइतकंच मुलीला जपणारा मुलगा जावई म्हणून हवा असतो. बाप-लेकीचे अतूट प्रेम दाखवणारा हा व्हिडीओ अनेकांना भावुक करत आहे. बाप-लेकीच्या या प्रेमाला नेटकरी पसंती देत असून व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत असून सगळ्यांची मन जिंकत आहे.