मुलांचे आयुष्य घडविण्यात आईवडिलांचा मोलाचा वाटा असतो. आपल्या आयुष्यातील आईच महत्त्व काय आहे याबाबत सर्वांना माहिती आहे पणआपल्या आयुष्याचा आधारस्तंभ असलेल्या, कायम कुटूंब प्रमुख म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या वडिलांविषयी आपण कधीतरी व्यक्त व्हायला हवं. आपल्या आयुष्यातील वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे या जाणीवेतून दरवर्षी जुनच्या तिसऱ्या रविवारी आपण ‘फादर्स डे’ साजरा करतो. या दिवशी अनेकजण आपल्या वडिलांप्रती प्रेम व्यक्त करतात.
वडिल मुलांचं नाते खूप खास असतं. यंदा तुम्ही देखील तुमच्या वडिलांचे तुमच्या आयुष्यात असलेले महत्त्व ओळखून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. तुमच्या वडिलांना ‘फादर्स डे’निमित्त खास शुभेच्छा देऊन तुमचं प्रेम व्यक्त करा. यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला वडिलांना खास शुभेच्छा देण्यासाठी हटके मेसेज सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगाच्या गर्दीत माझ्या,
सर्वात जवळ जे आहेत
माझे वडील, माझे देव
माझे नशीब ते आहेत
हॅप्पी फादर्स डे

बाप म्हणजे कोण असतं?
प्रत्येक पाखराचं छत्र असतं
अन् बिथरलेल्या आवाजाचं
पत्रं असतं..!!
बाप म्हणजे न संपणारं प्रेम असतं…
हॅप्पी फादर्स डे

(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

प्रत्येक दुखाचा क्षण सोपी असतो
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो
हॅप्पी फादर्स डे

खिसा रिकामा असूनही कधी ‘NO’ शब्द ऐकला नाही..
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती पाहिला नाही..
हॅप्पी फादर्स डे…

हेही वाचा : ७ जुलैपासून ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब बदलणार? होऊ शकतो अचानक धनलाभ!

(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आयुष्यभर झिजणारा बाप का कुणाच्या लक्षात राहत नाही
कुटूंबासाठी आयुष्य वेचणारा बाप का कुणाच्या नजरेत येत नाही
हॅप्पी फादर्स डे

प्रत्येक मुलीला वडिलासारखाच नवरा हवा असतो
कारण तिला माहिती असते की वडिलाइतके प्रेम तिला आजवर कुणीच केले नाही…
हॅप्पी फादर्स डे

कधी शांत तर कधी रागीट,
कधी प्रेमळ तर कधी कठोर,
कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या बहूरुपी बाबास पितृदिनाच्या खूप शुभेच्छा..

(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वडिलांसाठी काय स्टेटस ठेवावा..
त्यांच्यामुळेच आज माझं एक स्वत:चं आगळं वेगळं स्टेटस आहे..
हॅप्पी फादर्स डे

माझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी एक हात नेहमी माझ्या खांद्यावर होता..
तो कोणी नाही.. माझा लढाऊ बाप होता…
हॅप्पी फादर्स डे!!!

(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तुम्ही जगासाठी एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी तुम्ही संपूर्ण जग आहात..
हॅप्पी फादर्स डे!!!

बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो साजूक तुपाचा गोळा असतो
हॅप्पी फादर्स डे!!!

भाग्यवान असतात ती लोक
ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
इच्छा पूर्ण होतात सर्व
जर वडील त्याच्याबरोबर असतात.
हॅप्पी फादर्स डे!!!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers day special quotes wishes messages in marathi ndj